टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने धमाकेदार शतक ठोकलं
WATCH : KS Bharat Dedicates Hundred against England Lions to Lord Ram Ahead of Ayodhya Temple ‘Pran Pratishtha’ : टीम इंडिया आणि इंग्लंडमधील कसोटी मालिका येत्या 25 जानेवारीला सुरू होणार आहे. या मालिकेआधी भारत अ संघ आणि इग्लंड लायन्स संघात सामना सुरू आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या खेळाडूने शतक मारलं आहे. या खेळाडूच्या शतकाची जोरदार चर्चा होत आहे. कारण या खेळाडूने हे शतक प्रभू श्रीरामाच्या नावावर केलं आहे. सामन्यातील शतकानंतरचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कोण आहे तो टीम इंडियाचा शतक करणारा खेळाडू ज्याने प्रभू श्रीरामाला शतक अर्पण केलं.
केएस भरत याने इंग्लंड लायन्स संघाविरूद्ध 165 चेंडूत 15 चौकारांच्या मदतीने 116 धावा केल्या. हा कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. या शतकानंतर भरत याने प्रभू रामाला शतक अर्पण केल्याने त्याचं कौतुक होत असलेलं पाहायला मिळत आहे. कारण देशभरात राम मंदिराच्य उद्घाटनामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे.
केएस भरत याच्या शतकामुळे आता येत्या कसोटी सामन्यात त्याची प्लेइंग 11 मध्ये वर्णी लागते की नाही याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. इंग्लंडविरूद्धच्या पहिल्य दोन सामन्यांसाठी जाहीर झालेल्या संघात तीन विकेटकीपरचा समावेश आहे. यामध्ये केएल राहुल, ध्रुव जुरेल आणि केएस भरत यांचा समावेश आहे.
KS Bharat dedicated his hundred against England Lions to "Lord Ram".
– Bharat did bow & arrow celebration…!!!!pic.twitter.com/B13stcQBu7
— Johns. (@CricCrazyJohns) January 21, 2024
पहिल्या 2 कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर जड़ेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान
टेस्ट सीरिजसाठी इंग्लंड क्रिकेट टीम | बेन स्टोक्स (कॅप्टन), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), शोएब बशीर, झॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फोक्स, टॉम हार्टली, जॅक लीच, ऑली पोप, ऑली पोप. रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड
KS Bharat Hundred to Lord Ram
KS Bharat Hundred to Lord Ram
KS Bharat Hundred to Lord Ram
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements