India vs England Test Series 2024
पहिल्या 2 कसोटी सामन्यातून वैयक्तिक कारणामुळे माघार
IND vs ENG : अफगाणिस्तानला टी20 सीरिजमध्ये 3-0 ने क्लिन स्वीप दिल्यानंतर आता टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. इंग्लंड या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आली आहे. उभयसंघातील कसोटी मालिकेला 25 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या विराट कोहली याने पहिल्या 2 सामन्यातून वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली आहे. आता त्याच्या जागी कुणाला संधी मिळणार,अशी चर्चा सुरु झाली आहे (Kohli to skip first two Tests against England).
विराटच्या जागी कोण खेळणार, याबाबत बीसीसीआयने लवकरच जाहीर करणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र दुसऱ्या बाजूला विराटऐवजी ज्या खेळाडूला संधी मिळू शकते, त्याचं नाव आता चर्चेत आलं आहे. विराट कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या स्थानी खेळतो. चौथं स्थानी खेळणाऱ्या फलंदाजांवर मोठी जबाबदारी असते. विराट ही जबाबदारी आतापर्यंत सार्थपणे पार पाडतोय. आता विराट नसल्याने मुंबईकर श्रेयस अय्यर याला संधी मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.
टीम इंडियाने आपली अखेरची कसोटी मालिका ही दक्षिण आफ्रिके विरुद्ध खेळली होती. टीम इंडियाला महेंद्रसिंह धोनी याच्यानंतर रोहित शर्मा याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेत मालिका बरोबरीत राखण्यात यशं आलं. टीम इंडियाने 0-1 ने पिछाडीवर पडल्यानंतर दुसरा आणि अखेरचा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधली. मात्र या मालिकेत श्रेयस अय्यरल सपशेल अपयशी ठरला होता. श्रेयसने या 2 सामन्यांमधील 4 डावांमध्ये अनुक्रमे 31, 6, 0 आणि 4 अशा धावा केल्या होत्या.
तसेच रिपोटर्सनुसार, केएल राहुल या मालिकेत फलंदाजाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर तिथे दुसऱ्या बाजूला केएस भरत याने सराव सामन्यात इंग्लंड लायन्स विरुद्ध शतकी खेळी केली. केएसने या शतकी खेळीसह पहिल्या कसोटीसाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये आपला दावा आणखी मजबूत केला. त्यामुळे केएल फक्त बॅट्समन म्हणून खेळणार असेल, तर केएसचा विकेटकीपर म्हणून समावेश निश्चित आहे. त्यामुळे श्रेयसला प्लेईंग ईलेव्हनमध्ये संधी मिळेल की नाही, याबाबत अजूनही शंकाच आहे.
पहिल्या 2 कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान.
टेस्ट सीरिजसाठी इंग्लंड क्रिकेट टीम | बेन स्टोक्स (कॅप्टन), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), शोएब बशीर, झॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फोक्स, टॉम हार्टली, जॅक लीच, ऑली पोप, डॅन लॉरेन्स, रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड.
IND vs ENG Kohli to skip first two Tests against England
Kohli to skip first two Tests against England
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements