बेळगाव—belgavkar कर्नाटक : भाजपवर कमिशनचा आरोप करत सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारवरही आता कमिशनचा आरोप करण्यात येत आहे. भाजपवर कमिशनचा आरोप सरकारी ठेकेदारांनी केला होता, तर काँग्रेसवर त्यांचेच ज्येष्ठ नेते माजी मंत्री बी. शिवराम यांनी कमिशनचा आरोप केला आहे. विधानसभा निवडणूक काळात भाजपवर काँग्रेसने 40 टक्के कमिशनचा आरोप केला होता. शिवाय यावरून राज्यभरात रान उठवत काँग्रेस सत्तेवर आले. परंतु आता कमिशन वाढले असून त्याला आळा घालावा, अशी थेट मागणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे केली आहे, असे बी. शिवराम यांनी सांगितले.
शिवराम यांच्या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात नवीन वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवराम यांच्या आरोपामुळे विरोधी पक्षांनी सतारुढ काँग्रेस पक्षावर आरोपाच्या फैरी झाडायला सुरुवात केली आहे. यामुळे प्रदेश काँग्रेस अध्यक्षांनी शिवराम यांना ताकीद दिली आहे. याबाबत माहिती देताना शिवराम म्हणाले, विधानसभा निवडणूक काळात भाजपवर 40 टक्के कमिशनचा आरोप करण्यात आला. परंतु आता त्याहून अधिक कमिशन घेण्यात येत आहे. त्याला आळा घालावा, अशी मागणी केली आहे. केपीसीसी अध्यक्षांनी बजावलेल्या आदेशाचे मी स्वागत करतो. नको असेल तर वक्तव्य करणार नाही. त्यांनी पक्षहिताच्या दृष्टीने ताकीद दिली असेल.
हासन जिल्हा पंचायतीसाठी 13 कोटी अनुदान मिळाले होते. परंतु अनुदान वाटपात भेदभाव करण्यात आला आहे. याबाबत केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही आरोप असतील तर त्याबाबत जाहीर वाच्यता करण्याची गरज नाही. पक्षपातळीवर चर्चा करावी. यापुढे आरोप केल्यास पक्षविरोधी वक्तव्य केल्याची कारवाई करण्यात येईल.
भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. ते म्हणाले, काँग्रेस सरकारच्या घोटाळ्याचा दरवाजा उघडला आहे. हासन जिल्ह्यात झालेला टक्केवारीचा व्यवहार बाहेर पडला असून हा आरोप काँग्रेसच्या माजी मंत्र्यांनीच केला आहे. यापूर्वी कमिशनचा आरोप भाजपवर करण्यात येत होता. आता काँग्रेस भ्रष्टाचाराच्या दलदलीत रूतले आहे.
Belgaum Karnataka Congress leader accused of 40 percent corruption belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Karnataka Congress leader accused of 40 percent corruption
Karnataka Congress leader accused of 40 percent corruption
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements