फोटो काढताना श्वास रोखून धरताय? पोट आत खेचताय?
फुफ्फुस आणि आतड्यावर होईल वाईट परिणाम
How to Look Thinner in Pictures : बहुतेक जण प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न करतात. अलिकडे लहान मुलं तरुणाईसह मोठ्या व्यक्ती देखीलही क्रेझ वाढताना दिसत आहे. प्रत्येक फोटोमध्ये (Photos) प्रत्येकाला छान दिसायचं असतं. अनेक जण फोटो काढताना पोट दिसू नये म्हणून श्वास खेचून (Breath) पोट आतमध्ये (Stomach) घेण्याचा प्रयत्न करतात. तुम्हीही असं करत असाल, तर हे तुम्हाला महागात पडू शकतं. अशा प्रकारे पोट आत खेचण्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. फोटोमध्ये स्लिम दिसायचे असले तरीही पोटावर कधीही अनावश्यक दबाव टाकू नये. यामुळे फुफ्फुस आणि आतडे खराब होऊ शकतात. अशाप्रकारे पोटात आत खेचल्याने आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात जाणून घ्या.
प्रत्येक क्षण टिपण्यासाठी छायाचित्रे घेतली जातात आणि प्रत्येकाला परिपूर्ण दिसायचे असते. यासाठी पोटाची चरबी असलेले लोक श्वास रोखून पोट आत खेचतात. हे खूप सामान्य आहे परंतु शरीरासाठी खूप हानिकारक आहे. असे केल्याने तुम्ही काही काळ पातळ होऊ शकता पण त्यामुळे तुमच्या पोटाच्या स्नायूंवर दबाव येतो.
पचनावर वाईट परिणाम : पोट आतल्या बाजूने दाबल्याने, आतडे संकुचित होतात, ज्यामुळे पचन थांबते. श्वास रोखून पोट आत घेतल्याने पचन क्रियेवर परिणाम होतो. पचन सुरळीत होण्यासाठी अवयवांना आरामदायक वातावरण आवश्यक आहे, त्यामुळे श्वास रोखून पोटावर दबाव वाढवण्याची चूक करणं तुम्हाला महागात पडू शकतं.
फुफ्फुसे कमकुवत होतील : एका अहवालानुसार, पोट आतल्या बाजूला खेचल्याने डायाफ्रामची नैसर्गिक हालचाल कमी होते. यामुळे, श्वास घेण्याची क्षमता देखील कमी होऊ लागते, ज्यामुळे फुफ्फुसाची क्षमता हळूहळू कमी होते. त्यामुळे पोट आत घेण्याचा परिणाम थेट तुमच्या फुफ्फुसांवर पडू शकतो.
शरीराची ठेवण बिघडेल : पोट वारंवार दबाव पडल्याने शरीराची ठेवण किंवा मुद्रा खराब होते. श्वास रोखून पोट आतमध्ये घेतल्यास शरीर पोटाचे व्यवस्थापन करण्यावर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या नैसर्गिक आकारात बदल होतो. यामुळे अस्वस्थता, थकवा आणि पाठदुखीची समस्या होऊ शकते.
‘हे’ करायला सुरुवात करा How to Look Thinner in Pictures
श्वास रोखून पोट आत घेण्याऐवजी पोटाची चरबी कमी करण्यासाठी आपल्या आहारावर लक्ष केंद्रित करा. अधूनमधून उपवास करूनही वजन नियंत्रित केलं जाऊ शकतं. यामुळे कॅलरी बर्न होण्यास मदत होते. या चुकीच्या पद्धतीऐवजी काही आरोग्यदायी जीवनशैलीचा वापर करुन फीट राहा.तुमच्या आहारात ताजी फळे, भाज्या, फायबरयुक्त पदार्थ, हेल्दी फॅट्स, प्रथिने यांचा समावेश करा. प्रक्रिया न केलेले अन्न खाण्यास प्राधान्य द्या. जास्त चरबीयुक्त आणि जंक फूड खाणं टाळा. साखरचं सेवन कमी करा. शरीरातील चरबी काढून टाकण्यासाठी व्यायाम करा. व्यायामामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल आणि चरबी जाळण्यास मदत होईल. यामुळे त्वचेवर ग्लोही दिसू लागेल.
How to Look Thinner in Pictures
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements