Home Ministry Security Breach with Fake ID
राजधानी दिल्लीतून बुधवारी सकाळी एक धक्कादायक बातमी समोर आली. केंद्रीय गृहमंत्रालाच्या कार्यालयात एका तरुणानं घुसखोरी केल्याचं खळबळजनक वृत्त यंत्रणांकडून समोर आलं. दिल्लीतील कर्तव्यपथ पोलिसांनी त्याच्याकडून बनावट ओळखपत्र जप्त केलं. आदित्य प्रताप सिंह असं या तरुणाचं नाव आहे.
पोलिसांच्या स्पेशल सेल तसंच इतर एजन्सी त्याची चौकशी करत आहेत. या घटनेशी दहशतवादी कारवायांचा संबंध आहे का याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. मात्र संसद भवनातील तरुणांच्या घुसखोरीचं प्रकरण ताजं असताना आता थेट गृहमंत्रालयात घुसखोरी झाल्यानं इथल्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दिल्लीतील कर्तव्यपथ पोलिसांनी बनावट ओळखपत्राच्या बळावर नॉर्थ ब्लॉक येथे असणाऱ्या गृह मंत्रालयाच्या कार्यालयात चुकीच्या पद्धतीनं प्रवेश कण्याता प्रयत्न केला असता या तरुणाला ताब्यात घेतलं (Home Minister office in North Block with a fake identity card.). दरम्यान घुसखोरी करणारा तरुण नेमका कोणत्या कारणानं हे कृत्य करत होता याची माहिती सध्या समोर आलेली नाही. प्राथमिक माहितीनुसार आदित्य इथं फसवणुकीच्या हेतूनंच आल्याचं समोर आलं आहे.
13 डिसेंबरला संसदेमध्ये 2 तरुणांनी घुसखोरी करत संसद परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला होता. हे तरुण भाजप नेत्याच्या पासमुळं संसदेच्या प्रेक्षक गॅलरीमध्ये पोहोचले होते. ज्यावेळी संसदेत कामकाज सुरु होतं तेव्हाच त्या दोघांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि बुटामध्ये लपवून आणलेला पिवळ्या रंगाच्या धुराच्या नळकांड्या वापरत संसदेत गोंधळ माजवला होता. या दोन्ही तरुणांना त्यानंतर तातडीनं सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली होती. संसदेत हा गदारोळ सुरु असतानाच संसदेबाहेरही एका तरुण आणि तरुणीनं आंदोलनास सुरुवात केली होती. ज्यानंतर या प्रकरणात मनोरंजन डी, सागर शर्मा, नीलम झा, अमोल शिंदे, ललित झा आणि कुमावत यांच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती.
Home Ministry Security Breach with Fake ID
Home Ministry Security Breach with Fake ID
Home Ministry Security Breach with Fake ID
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements