आता त्यांच्या जाण्याने सायकल थांबली…
फिटनेस आयकॉन आणि प्रसिद्ध सायकलपटू
फिटनेस आयकॉन आणि कर्नाटकाची राजधानी बंगळुरुतील प्रसिद्ध सायकलपटू अनिल कडसूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 45 वर्षीय कडसूर यांनी सलग 42 महिने दररोज 100 किलोमीटर सायकलिंग करण्याचा विक्रम केला होता (Fitness Icon Anil Kadsur Passes Away). 31 जानेवारी रोजी अनिल यांनी सोशल मीडियावर हा अनोखा विक्रम पूर्ण केल्याची माहिती दिली होती. त्याच रात्री त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे निधन झाले.
सायकल चालवण्याचा एक दशकाहून अधिक अनुभव असलेल्या अनिल यांनी 2.25 लाख किलोमीटरहून अधिक सायकल चालवली आहे. त्यांचा हा अनोखा विक्रम अनेक सायकलस्वारांसाठी मोठी प्रेरणा आहे. त्यांच्याशी फक्त हस्तांदोलन करणे म्हणजे अनेक लोकांसाठी ऊर्जा आणि सकारात्मकता मिळवण्यासारखे होते. त्यांच्या अशा अकाली निधनाने हळहळ व्यक्त होत आहे (fitness trainer Anil Kadsur dies of heart attack at 45)
अनिल अतिशय नम्र स्वभावाचे होते. ते नेहमी नवीन सायकलस्वारांना प्रोत्साहन आणि सल्लेही द्यायचे. जवळचे लोक त्यांना ‘द्रोणाचार्य’ म्हणत.
विशेष म्हणजे, ते दररोज 100 किलोमीटर सायकल चालवायचे. हीच त्यांची खास ओळख होती. ऑगस्ट 2022 मध्ये एका सायकलिंग क्लबने त्यांना सलग 10 दिवस 100 किलोमीटर सायकल चालवण्याचे आव्हान दिले होते. हे आव्हान तर त्यांनी पूर्ण केलेच, पण यानंतर त्यांना दररोज 100 किलोमीटर सायकल चालवण्याचा छंद जडला. आता त्यांच्या अकाली जाण्याने अनिल कडसूर यांची सायकल थांबली…
Fitness Icon Anil Kadsur Passes Away
Fitness Icon Anil Kadsur Passes Away
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements