मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून फसवणुकीचे विचित्र प्रकरण समोर आले आहे. महानगरपालिकेत कर्मचाऱ्याने 43 वर्षे सहाय्यक वर्ग-3 पदावर नोकरी केली. त्याची निवृत्तीची वेळ जवळ आली होती. निवृत्तीनंतर आयुष्य सुखकर होईल, असे त्यांना वाटत होते, पण एका तक्रारीने सर्व काही उद्ध्वस्त केले.
हे संपूर्ण प्रकरण ग्वाल्हेर महापालिकेतील सहाय्यक वर्ग-3 कर्मचारी कैलाश कुशवाह यांचे आहे. कुशवाह यांनी जून 1981 मध्ये भाऊ रणेंद्र कुशवाह यांच्या मार्कशीटचा वापर करून ग्वाल्हेर महापालिकेत नोकरी मिळवली. विशेष म्हणजे, 43 वर्षे त्यांनी नोकरी केली, पण एका तक्रारीमुळे त्यांची पोलखोल झाली.
अनेक वर्षांनंतर अशोक कुशवाह नावाच्या व्यक्तीने महापालिकेत या फसवणुकीची तक्रार केल्यावर कैलास कुशवाहाचे सत्य समोर आले. ही माहिती समोर आल्यावर कैलाश कुशवाह यांना ऑगस्ट 2023 मध्ये नोकरीवरून काढून टाकण्यात आले. यानंतर महापालिकेचे उपायुक्त अनिल दुबे यांनी कैलास कुशवाहाविरोधात विद्यापीठ पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी कैलाश कुशवाहाविरुद्ध कलम 420,467, 468 आणि 471 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.
विशेष म्हणजे कैलाश कुशवाह यांचे भाऊ रणेंद्र सिंह कुशवाह हे देखील सरकारी नोकरीत आहेत. ते राज्य यंत्रमाग विणकर सहकारी शाखा, ग्वाल्हेर येथे कार्यरत आहेत. दोन्ही भाऊ एकाच मार्कशीटवर सरकारी नोकरी करत होते. ही फसवणूक उघडकीस आल्यानंतर विभागात खळबळ उडाली आहे.
employee who got the job on his brothers mark sheet was exposed before retirement in gwalior corporationemployee who got the job on his brothers mark sheet was exposed before retirement in gwalior corporation
employee got job brothers mark sheet gwalior corporation
employee got job brothers mark sheet gwalior corporation
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements