काय आहे Disease X? WHO चं वाढलं टेन्शन
What is Disease X? How scientists are gearing up for the upcoming pandemic? : कोरोना महामारीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानातून आपण अजून सावरलेलो नाही. याच दरम्यान आता तज्ज्ञांची चिंता आणखी एका रहस्यमयी व्हायरसमुळे वाढली आहे. डिजीज एक्स (Disease X) असं याचं नाव आहे. याचा खुलासा अद्याप झालेला नसला तरी, हा कोरोनापेक्षा तब्बल 20 पट जास्त धोकादायक असल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Disease X: What is it? Is it deadlier than COVID-19?
Disease X हा एक काल्पनिक व्हायरस आहे, जो पुढे गंभीर महामारीचं कारण बनू शकतो. हा आजार एक अज्ञात रोगजनक (अनेक रोगांना कारणीभूत असलेली गोष्ट) आहे. ज्याचा अर्थ शास्त्रज्ञांना अद्याप माहीत नाही की ते नेमकं काय आहे किंवा तो कसा पसरतो. मात्र, तो प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरू शकतो आणि वेगाने पसरू शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. डिजीज एक्ससाठी तयारी अत्यंत महत्वाची आहे कारण तो केव्हा किंवा कुठून येईल हे आपल्याला माहीत नाही. परंतु जर आपण तयार झालो तर आपण त्वरीत त्यावर प्रतिक्रिया देऊ शकतो, उपाययोजना करू शकतो आणि दुसर्या जागतिक महामारीला रोखण्यात मदत करू शकतो.
दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) येथे सध्या जगातील अनेक दिग्गज नेते एकत्र आले आहेत. ते ‘डिसीज एक्स’ च्या संभाव्य भविष्यातील साथीच्या चिंतेवर चर्चा करण्यास तयार आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे प्रमुख डॉ. टेड्रोस एधानोम घेब्रेयसस हे आरोग्य तज्ञ आणि उद्योगातील नेत्यांसोबत ‘डिसीज एक्सची तयारी’ या विषयावर चर्चा करणाऱ्या पॅनेलचे नेतृत्व करतील. दुसर्या गंभीर महामारीसाठी तयार राहण्यासाठी लस आणि औषध उपचारांसह प्लॅटफॉर्म तंत्रज्ञान विकसित करणं हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट आहे.
पश्चिम आफ्रिकेत 2014-2016 इबोला महामारीनंतर Disease X साठी तयारी सुरू झाली. त्यानंतर, WHO ने कोरोना व्हायरस, कोरोना, क्रीमियन-कांगो हेमोरेजिक फीवर, इबोला व्हायरस आणि मारबर्ग व्हायरस, लासा फीवर, मध्य पूर्व श्वसन सिंड्रोम (MERS), SARS, निपाह, हेनिपा व्हायरल रोग, रिफ्ट वॅली ताप, जीका, डिजीज एक्स यासह रोगांची लिस्ट बनवली आहे.
इबोलाच्या उद्रेकादरम्यान दिसलेला विलंब टाळण्यासाठी संशोधन आणि विकासाला गती देणे हे त्याचं उद्दिष्ट आहे, जेथे वेळेवर हस्तक्षेप न केल्यामुळे 11,000 लोकांना आपली जीव गमवावा लागला होता. Coalition for Epidemic Preparedness Innovations (CEPI) चा भाग असलेले संशोधक 3.5 ह बिलियन डॉलरच्या योजनेअंतर्गत संभाव्य महामारी ओळखल्याच्या 100 दिवसांच्या आत नवीन लसीकरण विकसित करण्यासाठी वेगाने लस प्लॅटफॉर्मवर सक्रियपणे काम करत आहेत.
What is disease X? How scientists are preparing for the next pandemic
disease X hypothetical disease next pandemic
disease X hypothetical disease next pandemic
disease X hypothetical disease next pandemic
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements