एक प्रसिद्ध रेस्टॉरंटमधील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका ग्राहकाच्या शाकाहारी जेवणात मृत उंदीर सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. एका आलिशान आणि प्रसिद्ध हॉटेलमधून (Barbeque Nation) हे जेवण मागवण्यात आलं, त्यात मेलेला उंदीर सापडला. धक्कादायक गोष्ट म्हणजे, हे अन्न खाल्ल्याने विषबाधा झालेल्या ग्राहकाला तब्बल 75 तास रुग्णालयामध्ये दाखल व्हावं लागलं. Lawyer राजीव शुक्ला असे त्या इसमाचे नाव असून त्याला या सगळ्याची झळ बसली. त्याने आता मुंबईतील बार्बेक्यू नेशन या रेस्तराँविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र या प्रकरणामध्ये अद्याप कोणतीही एफआयआर दाखल करण्यात आलेनी नाही.
मूळचे प्रयागराज (UP) येथील असलेले राजीव शुक्ला हे कामानिमित्त मुंबईत आले होते. 8 जानेवारी रोजी त्यांनी वरळीतील बार्बेक्यू नेशनमधून व्हेज जेवण मागवले. मात्र त्यातील दाल मखनी खाल्ल्यावर त्यांना काहीतरी विचित्रच चव लागली. म्हणून त्यांनी त्या डब्याची नीट तपासणी केली असता त्यामध्ये मेलेला उंदीर आणि झुरळ आढळलं. एवढंच नव्हे तर ते जेवण जेवल्यावर त्यांची तब्येत बिघडली. पोटदुखी,मळमळ असा त्राही जाणवू लागला. राजीव यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. पुढचे 75 तास (3 दिवस) ते रुग्णालयातच होते.
राजीव शुक्ला यांनी बार्बेक्यू नेशनचे मालक, व्यवस्थापक आणि शेफ यांच्याविरुद्ध नागपाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. परंतु अद्याप एफआयआर झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं.
Dead Mouse in Veg Meal Ordered From Mumbai’s BBQ Nation
Mumbai : BBQ Nation Refutes Customer’s Claim of Dead Mouse Found in Food
Dead Mouse in Veg Meal Mumbai BBQ Nation
Dead Mouse in Veg Meal Mumbai BBQ Nation
Dead Mouse in Veg Meal Mumbai BBQ Nation
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements