एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीश आणि खासगी वकील या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यामुळे न्यायाधीशांनी न्यायालय अवमानप्रकरणी गोंदिया येथील एका वकिलाला 90 रुपये दंड किंवा दंड न भरल्यास 5 दिवसांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. दरम्यान दंड न भरल्यामुळे सदर वकिलाला 5 दिवसाच्या कारावासाची शिक्षा भोगावी लागली. या प्रकरणाचा महाराष्ट्रात सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात आला.
दरम्यान भंडारा येथेही जिल्हा वकील संघाच्या वतीने या प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यात आला. गोंदिया किंवा भंडाऱ्यातच काय तर महाराष्ट्रात कुठेही अशी कारवाई झाल्यास आम्ही खपवून घेणार नाही, असे मत भंडारा जिल्हा वकील संघाचे जिल्हाध्यक्ष प्रभात मिश्रा यांनी व्यक्त केले त्यावेळी जिल्हा वकील संघाचे सदस्य आणि वकील उपस्थित होते.
गोंदिया जिल्हा न्यायालयात धनादेश अनादर प्रकरणावर सुनावणी सुरू होती. पक्षकाराचे वकील म्हणून पराग तिवारी हे न्यायालयात काही क्षण उशिरा हजर झालेत. त्यावरून न्यायाधीश कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली. न्यायाधीशाकडून करण्यात आलेल्या वक्तव्यावर पराग तिवारी यांनी आक्षेप घेतला. भर न्यायालयात न्यायाधीश आणि वकिलात शाब्दिक चकमक झाली. न्यायालयात झालेल्या संभाषणामुळे ‘कंटेम्प्ट ऑफ कोर्ट’ खाली अॅड. पराग तिवारी यांना न्यायाधीश कुलकर्णी यांनी आर्थिक दंड व दंड न भरल्यास पाच दिवसाची शिक्षा सुनावली.
अॅड.तिवारी यांनी दंड न भरण्याची भूमिका घेतल्याने त्यांची गुरुवारी सायंकाळी कारागृहात रवानगी करण्यात आली. न्यायालयाच्या निकालानंतर गोंदिया जिल्हा वकील संघाकडून नाराजी व्यक्त केली जात होती. अशातच जिल्हा वकील संघाकडून अॅड. पराग तिवारी यांना शिक्षा ठोठावल्या प्रकरणी लेखणीबंद (पेनडाऊन) आंदोलनाची हाक देण्यात आली. आंदोलनाला जिल्ह्यातील वकिलांनी प्रतिसाद देत सर्व न्यायालयात काम बंद ठेवले. गोंदिया, देवरी, आमगाव, सडक अर्जुनी, तिरोडा येथे वकिलांच्या ‘पेनडाऊन’ आंदोलनामुळे न्यायालयाच्या कामावर परिणाम झाला.
Controversy with judge Lawyers Gondia 90Rs
Controversy with judge Lawyers Gondia 90Rs
Controversy with judge Lawyers Gondia 90Rs
Controversy with judge Lawyers Gondia 90Rs
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310