Former Intel India head Avtar Saini
नवी मुंबई : इंटेल इंडियाचे माजी प्रमुख अवतार सैनी यांचा अपघातात दुर्देवी मृत्यू झाला (Ex-Intel India head, Avtar Saini). नवी मुंबईत सकाळी ते सायकल चालवत होते. त्यावेळी वेगात आलेल्या टॅक्सीने त्यांच्या सायकलला धडक दिली. यात अवतार सैनी यांचा मृत्यू झाला. बुधवारी पहाटे 5.50 च्या सुमारास हा दुर्देवी अपघात झाला. नेरुळच्या पाम बीच रोडवर अवतार सैनी आपल्या अन्य सहकाऱ्यांसोबत सायकल चालवत होते. त्यावेळी हा अपघात झाला. अवतार सैनी 68 वर्षांचे होते (Former Intel India head Avtar Saini run over while cycling in Navi Mumbai).
टॅक्सी चालकाने मागून येऊन सैनी यांच्या सायकलला धडक दिली. अपघातानंतर ड्रायव्हरने घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. सायकलचा मागचा भाग टॅक्सीच्या पुढच्या चाकांखाली आला. या अपघातात अवतार सैनी यांना गंभीर मार लागला. सहकारी सायकलस्वार यांना जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. पण डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं (Ex-Intel India head dies after being hit by cab while cycling in Mumbai).
अवतार सैनी चेंबूरचे रहिवासी होते. त्यांनी इंटेल 386 आणि 486 मायक्रोप्रोसेसरच्या निर्मितीवर काम केलं होतं. कंपनीच्या पेंटियम प्रोसेसरची डिजाइन बनवण्याच नेतृत्वही त्यांनी केलं होतं. पोलिसांनी आरोपी टॅक्सी ड्रायव्हर विरोधात विविध कलमांखाली गुन्हा नोंदवलाय. 279, 337, 304-अ या कलमांखाली गुन्हा नोंदवलाय.
Former Intel India head Avtar Saini run over while cycling in Navi Mumbai
Ex-Intel India head, Avtar Saini, killed after being knocked down by speeding cab in Navi Mumbai
Former Intel India head Avtar Saini
Former Intel India head Avtar Saini
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements