Congress govt is unable to manage guarantees
कर्नाटक विधानसभा निवडणुकीतदिलेले एकही आश्वासन काँग्रेसला पूर्ण करता आले नाही. बस प्रवास मोफत म्हणतात, पण बस कमी केल्या. १० किलो तांदूळ अद्याप दिलेला नाही. केवळ तीन हजार बेरोजगारांनाच वेतन मिळाले आहे. राज्याचा विकास ठप्प असून, काँग्रेसची गॅरंटी चालणार नाही, असे सरकारमधील मंत्रीच म्हणत आहेत, असा आरोप केंद्रीय अन्नपुरवठा व सार्वजनिक वितरणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केला.
मंत्री जोशी म्हणाले, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने गृहलक्ष्मी योजना जाहीर केली. या अंतर्गत प्रत्येक महिलेला २००० रुपये देण्याचे आश्वासन दिले. सप्टेंबरपासून आजअखेर कोणतीही रक्कम मिळाली नाही. महिलांना मोफत बस प्रवास योजना जाहीर केली. मात्र, तोटा वाढल्याने बसची संख्या कमी केली. पण, आता इंधनासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. १० किलो तांदूळ मोफत देण्याची घोषणा निवडणुकीसाठी केली. अद्याप त्यांना तांदूळ देता आलेला नाही.
२०० युनिट मोफत वीज देणार असे ते म्हणाले होते, प्रत्यक्षात अनेक अटी घालून केवळ ५५ युनिट मोफत देत आहेत. बेरोजगार युवकांना वेतन म्हणून दरमहा ३००० रुपये देण्याची घोषणा होती. यासाठी साडेतीन लाख युवकांनी नोंदणी केली. त्यातील केवळ तीन हजार युवकांनाच वेतन दिले जाते. कर्नाटक सरकार विकासाची कोणतीही योजना राबवू शकत नाही. कारण त्यांच्यावर मोठा आर्थिक भार आहे, असे विधान मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार करतात. त्यामुळे निवडणुकीत दिलेले गॅरंटी कार्ड आता चालणार नाही, असे कर्नाटक सरकारमधील मंत्री जाहीरपणे बोलू लागले आहेत. महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये कर्नाटक मॉडेलचा हवाला देणाऱ्या काँग्रेसने कर्नाटकचे दिवाळे काढले आहे.
कोल्हापुरातील पत्रकार परिषदेला माजी आमदार अमल महाडिक, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे उपस्थित होते.
Congress govt is unable to manage guarantees
Congress govt is unable to manage guarantees
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements