3 औषधांची पुन्हा तपासणी
डॉक्टरांकडून सर्रास दिल्या जाणाऱ्या वेदना तसेच सर्दी-खोकल्यासाठी दिल्या जाणाऱ्या 3 औषधांची पुन्हा तपासणी केली जात आहे. केंद्रीय औषध नियमक मंडळाने ही औषधे बनवणाऱ्या कंपन्यांना याचा प्रभाव आणि सुरक्षेततेची चाचणी करण्यासाठी याच्या नव्याने ट्रायल घेण्याचे निर्देश दिले आहेत. ही औषधे नेहमी सर्दी आणि खोकला झाल्यानंतर दिली जातात. याशिवाय फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (FDCs – fixed-dose combination) मधील एका पेन किलरचा देखील या औषधांमध्ये समावेश आहे. ही औषधे मागील 30 वर्षांपेक्षा अधिक काळापासून विकली जात आहेत. एक सिंगल डोस देण्यासाठी दोन किंवा अधिक औषधे एकत्र करून दिली जातात तेव्हा त्याला फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन म्हटले जाते.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, घोकला आणि सर्दीसाठी दिल्या जाणाऱ्या ज्या औषधांचे पुन्हा तपासणी करण्यासाठी पुन्हा नव्याने ट्रायल घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामध्ये एक पॅरासिटामॉल (अँटीपायरेटिक), फिनाइलफ्राइन हायड्रोक्लोराइड (नाकासंबंधी संर्दी-खोकल्याचे औषध) आणि कॅफीन एनहायड्रस (प्रोसेस्ड आणि कॅफीन) युक्त औषधांचा समावेश आहे. दुसरं औषध कॅफीन एनहायड्रस, पॅरासिटमॉल, हायड्रोक्लोराइड आणि क्लोरपेनिरामाइन मॅलेट (अंटी-एलर्जी औषध) यांचा समावेश आहे (Paracetamol (antipyretic), Phenylephrine Hydrochloride (nasal decongestant) and Caffeine Anhydrous (processed caffeine) – Caffeine Anhydrous, Paracetamol, Hydrochloride (salt) and Chlorpheniramine Maleate (anti-allergic medication) in different compositions).
केंद्रीय औषध नियमक मंडळाने (Central Drugs Standard Control Organization) ने तिसऱ्या पेन किलरसाठी पोस्ट मार्केटींग देखरेखीचा सल्ला दिला आहे. जेणेकरून त्याची सुरक्षा आणि प्रभाव याबद्दल डेटा तयार केला जाऊ शकेल. तसेच हे औषध नॉन-स्टेरॉयडल अँटी इंफ्लेमेटरी ड्रग अंतर्गत येते. या औषधामध्ये पॅरासिटामॉल, प्रोपीपेनाजोन (एक एनाज्लोसिक आणि अँटीपायरेटिक) आणि कॅफीन असते.
वेदनेसाठी दिल्या जाणाऱ्या औषधाच्या प्रकरणात समितीने थोडी सोम्य भूमिका घेतली आहे. यामध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या डोकेदुखीसाठी औषध बनवणे आणि विक्री करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र यासाठी अटी घालण्यात आली आहे की डोस हा पाच ते सात दिवसांपेक्षा अधिक नसला पाहिजे. औषध नियमक मंडळाचा हा आदेश 1988 च्या आधीच्या काही औषधांची तपासणी करण्यासाठी 2021 मध्ये स्थापन झालेल्या एका तज्ज्ञ समितीच्या सूचनेनुसार देण्यात आले आहे. सांगितले जात आहे की ही औषधे तयार करणे आणि विक्री करणे यासाठी लायसेंसिंग अथॉरिटीकडून योग्य ते अप्रुव्हल देण्यात आलं नव्हतं.
दरम्यान एफडीसी म्हणजेच एकापेक्षा अधिक औषधे एकसोबतच देणं तेव्हाच योग्य मानलं जातं जेव्हा जास्त प्रभाव पडण्याची शक्यता असते, तसेच औषधांचा वेगळा परिणाम टाळायचा असतो किंवा औषधाचा परिणाम कमी करायचा असतो. इंडियन जर्नल ऑफ फार्माकोलॉजीमध्ये प्रकाशित एका लेखामध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील फार्माकोलॉजीचे माजी प्रमुख डॉ वाय के गुप्ता आि डॉ. सुंगती एस रामचंद्र यांनी भारतात उपलब्घ एपडीसीनी ‘द गुड, द बॅड अँड अग्ली’ या तीन रुपात विभागले आहे.
3 commonly used pain, cough and cold medicines under scanner
commonly used pain cough and cold medicines
commonly used pain cough and cold medicines
commonly used pain cough and cold medicines
commonly used pain cough and cold medicines
commonly used pain cough and cold medicines
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements