CAR-T cell therapy चे उपचार ठरले यशस्वी
भारतातील कर्करोगाने त्रस्त असलेल्या लाखो रुग्णांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय औषध कर्करोगावर प्रभावी ठरले आहे. पहिल्या रुग्णाला सीएआर-टी सेल थेरपीने कर्करोगातून मुक्त केले आहे (Indian-made CAR-T cell therapy). ही थेरपी आयआयटी बॉम्बे आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलने विकसित केली आहे. ही थेरपी 15 रुग्णांना देण्यात आली होती, त्यापैकी 3 रुग्णांचा कर्करोग पूर्णपणे नियंत्रणात आला आहे (Patient declared cancer free using Indian-made CAR-T cell therapy)
औषध नियामकाने सीएआर-टी सेल थेरपीच्या व्यावसायिक वापरास मान्यता दिली आहे. काही महिन्यांनंतरच ही थेरपी रुग्णांवर प्रभावी ठरली. दिल्लीतील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. कर्नल व्हीके गुप्ता (64) यांनी 42 लाख रुपये खर्च करून या थेरपीद्वारे कॅन्सरपासून मुक्ती मिळवली. या थेरपीतून बरे होणारे ते पहिले रुग्ण आहेत. परदेशात कर्करोगाच्या उपचारासाठी तीन ते चार कोटी रुपये
कॅन्सरवर मात करणारे गुप्ता म्हणतात… : कॅन्सरवर मात करणारे डॉ. गुप्ता म्हणाले की, 2022 मध्ये मी पुन्हा कामावर जाऊ शकेन आणि मी कॅन्सरवर मात करू शकेन, असे मला कोणी सांगितले असते, तर तो विनोद वाटला असता. मी 28 वर्षे सैन्यात डॉक्टर म्हणून काम केले. मी लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया या वेगाने वाढणाऱ्या कर्करोगाने ग्रस्त होतो. जेव्हा माझे बोन मॅरो प्रत्यारोपण अयशस्वी झाले, तेव्हा मला वाटले की, माझ्याकडे फक्त काही दिवस शिल्लक आहेत; परंतु सीएआर-टी सेल थेरपीने मला वाचवले. मला आता सैनिकासारखे वाटत आहे, थकलो आहे; पण हार मानणार नाही.
टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले की, डॉ. गुप्ता कॅन्सरपासून पूर्णपणे मुक्त झाले आहेत. डॉ. हसमुख जैन म्हणाले की, हे उपचार आयुष्यभर प्रभावी ठरतील. डॉ. गुप्ता पुन्हा कॅन्सरचे रुग्ण होणार नाहीत हे सांगणे घाईचे आहे; परंतु सध्या ते यातून मुक्त झाले आहेत. पहिल्या टप्प्यात उत्तर परिणाम दिसत आहे. थेरपी किती यशस्वी ठरते, हे समजण्यासाठी 2 वर्षे लागतील. या थेरपीमुळे कर्करोगाच्या उपचारात क्रांती होईल आणि त्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचतील, अशी अपेक्षा आहे.
cancer free Indian-made CAR-T cell therapy
cancer free Indian-made CAR-T cell therapy
cancer free Indian-made CAR-T cell therapy
cancer free Indian-made CAR-T cell therapy
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements