BJP using Waqf issue as ‘political weapon’: Karnataka Home Minister
शांततेचा भंग केल्यास कठोर कारवाई
कर्नाटक : वक्फच्या नावाखाली शांतता भंग केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी दिला आहे. वक्फ वादाच्या निषेधार्थ भाजपच्या आंदोलनाच्या पार्शवभूमीवर ते बोलत होते.
भाजप वक्फचा मुद्दा राजकीय शस्त्र म्हणून वापरत आहे. हा मुद्दा गाजवून राज्यात जातीय दंगली घडवून शांतता भंग करण्याचा प्रयत्न होत असेल तर तो निर्दयीपणे ठेचून काढला जाईल. जातीय दंगली घडवून शांतता नष्ट करण्यासाठी ते काहीही करू शकतात. तसा प्रयत्न केल्यास त्यावर कारवाई होईल, असा इशारा त्यांनी दिला.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची योजना भाजपने राबविली आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ते शक्य नाही. गृह विभागाने गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील कायदा व सुव्यवस्था सक्षमपणे हाताळली असून, शांतता भंग होणार नाही याची काळजी घेतली आहे. भविष्यात कोणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल.
BJP using Waqf issue as political weapon
BJP using Waqf issue as political weapon
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements