भारत जोडो न्याय यात्रेत चेंगराचेंगरी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘Bharat Jodo Nyay Yatra‘ सध्या बिहारमध्ये आहे. बुधवारी त्यांनी कटिहारमध्ये पदयात्रा केली आणि लोकांना अभिवादन केलं. या यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची माहिती असून राहुल गांधी यांच्या कारचंही नुकसान झालं आहे. यातून राहुल गांधी थोडक्यात बचावले आहेत. त्यानंतर ते कारमधून उतरून बसमध्ये बसले आणि प्रशासनाने लोकांना शांत केले.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज 18 वा दिवस आहे. त्यांची यात्रा बिहारमधून बंगालमध्ये दाखल होणार आहे. राहुलच्या या प्रवासात मिरचाईबारी डीएस कॉलेजमार्गे लाभा येथील जाहीर सभेनंतर ते बंगालला रवाना होतील.
भारत जोडो न्याय यात्रेत 14 राज्ये, 85 जिल्ह्यांचा समावेश
राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरपासून सुरू होऊन 20 मार्चला मुंबईत सांगता होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 4 महिन्यांआधीच ही यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा 14 राज्ये आणि 85 जिल्ह्यांतून जाणार आहे. या काळात राहुल गांधी पायी आणि बसने 6200 किलोमीटरहून अधिक प्रवास करणार आहेत. जनतेसमोर देशातील सद्य परिस्थिती मांडणार आहेत. जनतेच्या त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो न्याय यात्रा काढण्यात येत आहे. मागच्याच आठवड्यात आसामध्ये सोनितपूर जिल्ह्यात जमावाने राहुल गांधींची बस अडवली होती आणि मोदी मोदीच्या घोषणा दिल्या होत्या. राहुल गांधी यांनीही आपल्या अंदाजात या जमावाला फ्लाईंग किस दिला. यावेळी राहुल गांधी बसमधून खाली उतरले होते. मात्र, त्याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांनी त्यांना बसमध्ये बसवले होते.
Bharat Jodo Nyay Yatra Rahul Gandhi Katihar
Bharat Jodo Nyay Yatra Rahul Gandhi Katihar
Bharat Jodo Nyay Yatra Rahul Gandhi Katihar
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements