अमित शहा म्हणाले, इतिहास ओळखत नाहीत ते…
नवी दिल्ली | 10 फेब्रुवारी 2024 : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज अखरेचा दिवस आहे. सकाळी 11 वाजता लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. यावेळी ‘राममंदिर निर्माण आणि प्राणप्रतिष्ठा’ या विषयावरील आभाराच्या प्रस्तावावर चर्चा झाली. या प्रस्तावादरम्यानच लोकसभेत ‘बाबरी मशीद होती, आहे आणि राहील… बाबरी मशीद जिंदाबाद, भारत जिंदाबाद’ अशा घोषणा आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गृहमंत्री अमित शहा या घोषणाबाजीला उत्तर देताना म्हणाले, 22 जानेवारी हा 10 हजार वर्षांचा ऐतिहासिक दिवस असणार आहे हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे. जे इतिहास ओळखत नाहीत ते आपले अस्तित्व गमावून बसतात, असा टोला लगावला (Watch Video : Asaduddin Owaisi says ‘Babri Masjid Zindabad’ in Lok Sabha).
लोकसभेत राम मंदिर उभारणीसाठी आभाराच्या चर्चेदरम्यान एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी पीव्ही नरसिंह राव आणि लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्याच्या पुरस्कारावर प्रश्न उपस्थित केले. शिवसेना (शिंदे गट) खासदार त्यांच्या भाषणात म्हणाले की, 6 डिसेंबरला बाबरी मशीद शहीद झाली तेव्हा माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव पूजा करत होते. मला त्रास देऊ नका, मी. मी पूजा करतोय असे नरसिंह राव म्हणाले होते. मस्जिद शहीद झाली तेव्हा जी व्यक्ती पूजा करत होता आणि ज्या व्यक्तीने मशीद पाडण्यासाठी रथयात्रा काढली त्यांना केंद्र सरकारने भारताच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले. हे न्याय जिवंत आहे की अत्याचार कायम आहे हेच सांगते, अशी टीका असदुद्दीन ओवेसी यांनी यावेळी केली.
मर्यादा पुरुषोत्तम राम यांचा आदर आहेच. पण, नथुराम गोडसे याचा आम्ही द्वेष करतो. कारण, त्याने अशा व्यक्तीला गोळ्या घातल्या ज्याच्या तोंडातून ‘हे राम’ हे शेवटचे शब्द निघाले. पंतप्रधान येथे उत्तर देतील तेव्हा ते 140 कोटी जनतेचे पंतप्रधान म्हणून बोलतील की ते हिंदुत्वाचे नेते म्हणून बोलतील. अयोध्येत मशीद होती, आहे आणि राहील. बाबरी मशीद चिरंजीव आहे. बाबरी मशीद जिंदाबाद अशा घोषणाही असदुद्दीन ओवेसी यांनी दिल्या.
#WATCH | During the discussion on the construction of the historic Ram Temple and Pran Pratishta begins in Lok Sabha, AIMIM MP Asaduddin Owaisi says "I want to ask if Modi Govt is the government of a particular community, religion or the government of the entire country? Does GoI… pic.twitter.com/cU6tS1WIxu
— ANI (@ANI) February 10, 2024
असदुद्दीन ओवेसी यांच्या भाषणानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणातून त्यांचा समाचार घेतला. 22 जानेवारी हा दिवस 1528 मध्ये सुरू झालेल्या अन्यायाविरुद्धच्या संघर्ष आणि चळवळीचा शेवट आहे. न्यायाचा लढा इथे संपला. जे इतिहास ओळखत नाहीत ते आपले अस्तित्व गमावून बसतात, अशी टीकाही त्यांनी केली. अमित शहा यांचे भाषण सुरु असतानाच असदुद्दीन ओवेसी हे सभागृहातून निघून गेले. भाजपचे ज्येष्ठ नेते सत्यपाल सिंह यांनी या चर्चेला सुरुवात केली होती. पीएम मोदी यांच्या आगमनानंतर देशात रामराज्य आले आहे असे ते म्हणले. लोकसभेत राम मंदिरावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन एक दिवसाने वाढवण्यात आले आहे.
Asaduddin Owaisi Babri Masjid Zindabad in Lok Sabha. Asaduddin Owaisi Babri Masjid Zindabad in Lok Sabha. Asaduddin Owaisi Babri Masjid Zindabad in Lok Sabha
Asaduddin Owaisi Babri Masjid Zindabad in Lok Sabha
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements