भाजपचा आरोप
मुलं चोरणारे असण्याच्या संशयावरुन 3 साधूंना लोकांनी बेदम मारहाण केल्याची घटना बंगालमध्ये समोर आली आहे. पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यातील ही घटना असल्याचं सांगण्यात आलं आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी आपल्या X हँडलवरुन या प्रकाराचा कथित व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी बंगालमधील ममता सरकारवर टीकाही केली आहे.
पश्चिम बंगालच्या पुरुलियामधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मकर संक्रांतीसाठी गंगासागरला जाणाऱ्या साधूंना पालघरमध्ये झालेल्या घटनेप्रमाणेच मारहाण करण्यात आली. साधूंना मारहाण करणारे हे गुंड सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाशी संबंधित आहे. ममता बॅनर्जींच्या सरकारमध्ये शहाजहान शेख सारख्या दहशतवाद्याला सुरक्षा मिळते, आणि साधूंना मारहाण केली जात आहे. पश्चिम बंगालमध्ये हिंदू असणं हाच गुन्हा आहे, असं मालवीय यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अमित मालवीय हे भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख आहेत. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओची सत्यता अद्याप पडताळण्यात आलेली नाही. आम्हीही या व्हिडिओची पुष्टी करत नाही.
2020 साली महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये मुलं चोरणारे समजून साधूंना बेदम मारहाण केली होती. यामध्ये 2 साधूंचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी 100 हून अधिक नागरिकांना अटक करण्यात आली होती.
3 sadhus from UP, en route to Gangasagar Mela, assaulted in Bengal, 12 arrested
‘Palghar-kind lynching’: BJP targets TMC govt over ‘assault’ on sadhus in Bengal
3 sadhus from UP assaulted in West Bengal
3 sadhus from UP assaulted in West Bengal
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements