भारताच्या महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक Yuvraj Singh
भारताच्या महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेल्या युवराज सिंगने (Yuvraj Singh) इंडियन प्रीमिअर लीगमधील फ्रँचायझी गुजरात टायटन्ससोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. गुजरातचा मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा (Ashish Nehra) याच्याकडे काम मागितले होते, परंतु त्याने नकार दिल्याचा दावा युवीने केला आहे. सिक्सर किंगने भविष्यात आयपीएल संघाचा मार्गदर्शक बनू इच्छित असल्याचेही सूचित केले.
युवराज आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज (पूर्वीचे नाव किंग्स इलेव्हन पंजाब), सहारा पुणे वॉरियर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांसारख्या फ्रँचायझींसाठी खेळला आहे. त्याने 132 आयपीएल सामन्यांमध्ये 83 या सर्वोच्च धावसंख्येसह 2750 धावा केल्या आहेत. 42 वर्षीय युवराजने म्हटले की, त्याने गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक आणि त्याचा जवळचा मित्र आशिष नेहरा याला संघात नोकरीसाठी विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने नकार दिला.
युवराज सिंग म्हणतो, मी आशिष नेहराकडे नोकरी मागितली होती, पण त्याने ती नाकारली. बघू कुठे कुठे जबाबदारी मिळते का, पण सध्या तरी मला संतुलन राखावे लागेल. सध्या माझी प्राथमिकता माझी मुले आहेत. एकदा त्यांची शाळा सुरू झाली की मला आणखी वेळ मिळेल. त्यामुळे मी कोचिंग निवडू शकतो. मला तरुणांसोबत काम करायला आवडते, विशेषत: माझ्या राज्यातील मुलांसोबत आणि मला असे वाटते की मार्गदर्शन करणे हे मला करायला आवडेल. निश्चितपणे आयपीएल संघांपैकी एकाचा भाग व्हायचे आहे, मी निश्चितपणे याबद्दल विचार करत आहे. दोन वेळा भारतीय वर्ल्ड चॅम्पियन संघाचा हिरो ठरलेल्या युवराजने भविष्यात टीम इंडियाचा मेंटर होण्यात रस दाखवला आहे.
Asked Ashish Nehra For A Job At Gujarat Titans But He Declined, Claims Yuvraj Singh
Yuvraj Singh Ashish Nehra Controversy IPL GT
Yuvraj Singh Ashish Nehra Controversy IPL GT
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements