worm in Cadbury Dairy Milk Chocolate Video
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच कॅडबरी चॉकलेट आवडते. मात्र, कॅडबरी डेअरी मिल्कच्या चॉकलेटमध्ये जिवंत अळी आढळल्याचा दावा एका व्यक्तीने केला आहे. तसेच, यासंबंधीचा व्हिडिओ या व्यक्तीने सोशल मीडिया एक्सवर (ट्विटर) शेअर केला आहे. रॉबिन झॅकियस नावाच्या हैदराबादमधील एका व्यक्तीने ही पोस्ट शेअर केली आहे. विशेष म्हणजे, येथील मेट्रो स्टेशनवरील स्टोअरमधून रॉबिन झॅकियस यांनी कॅडबरी चॉकलेट खरेदी केले होते (worm in Cadbury Dairy Milk Chocolate).
रॉबिन झॅकियस यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, अमीनपेटमधील रत्नदीप मेट्रोमधून खरेदी केलेल्या कॅडबरी चॉकलेटमध्ये एक जिवंत अळी सापडली आहे. या अशा एक्स्पायरी डेट जवळ आलेल्या उत्पादनांची तपासणी करण्यासाठी कुठली यंत्रणा आहे? सार्वजनिक आरोग्याच्या धोक्याबाबत कोण जबाबदार आहे? असा प्रश्न रॉबिन झॅकियस यांनी उपस्थित केला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनुसार, डेअरी मिल्क कॅडबरीच्या अर्धवट फाडलेल्या रॅपरमध्ये कॅडबरीवर वळवळणारी जिवंत अळी दिसत आहे.
Found a worm crawling in Cadbury chocolate purchased at Ratnadeep Metro Ameerpet today..
Is there a quality check for these near to expiry products? Who is responsible for public health hazards? @DairyMilkIn @ltmhyd @Ratnadeepretail @GHMCOnline @CommissionrGHMC pic.twitter.com/7piYCPixOx
— Robin Zaccheus (@RobinZaccheus) February 9, 2024
या व्हिडीओसोबत खरेदीचे बिलही पोस्ट करण्यात आले आहे. त्यात 9 फेब्रुवारीला ही कॅडबरी मेट्रो स्टेशनवरील रत्नदीप रिटेल शॉपमधून 45 रुपयांना खरेदी केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, रॉबिन झॅकियस यांनी केलेली ही पोस्ट व्हायरल झाली असून कॅडबरीच्या गुणवत्तेवर काही युजर्स प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले आहेत. दरम्यान, यावर रॉबिन झॅकियस यांनी केलेल्या पोस्टवर कॅडबरी डेअरी मिल्क कंपनीकडून रिप्लाय सुद्धा दिला आहे.
काय म्हटले आहे कंपनीने? : कंपनीने म्हटले आहे की, नमस्कार. मंडेलेज इंडिया फूड प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीची कॅडबरी इंडिया लिमिटेड) नेहमीच उत्पादनांचा उच्च दर्जा राखण्यासाठी प्रयत्नशील असते. तुम्हाला आलेल्या वाईट अनुभवासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. तुमच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी कृपया तुमची तक्रार [email protected] वर पाठवा. त्यासोबत तुमचे पूर्ण नाव, पत्ता, फोन नंबर आणि खरेदीची माहिती द्या, अशी विनंती कंपनीकडून करण्यात आली आहे.
worm in Cadbury Dairy Milk Chocolate
worm in Cadbury Dairy Milk Chocolate
worm in Cadbury Dairy Milk Chocolate
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements