Woman Allegedly Kills Husband | Insta Reels : पतीने पत्नीला व्हिडिओ आणि रिल्स बनवण्यापासून विरोध केला…. याचा राग मनात ठेवून पत्नी आणि तिच्या घरच्यांनी त्याची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बिहारच्या बेगूसरायमधील खोदाबंदपुर क्षेत्रातील फफौत गावातील आहे.
महेश्वर कुमार रॉय असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. महेश्वरचे लग्न 6-7 वर्षांपूर्वी फफौत या गावात राहणाऱ्या रानी कुमारीसोबत झालं होतं. महेश्वर कोलकाता येथे राहून मजुरी करत होता आणि अलीकडेच तो घरी आला होता. गेल्या काही दिवसांपासून त्याची पत्नी रानी कुमारी इन्स्टाग्रामवर भरपुर व्हिडिओ बनवायची. पण महेश्वरला पत्नीचे व्हिडिओ करणे आवडत नव्हते. तो सातत्याने तिचा विरोध करायचा. मात्र राणीला ते आवडत नव्हते तीने त्याचा विरोध झुगारुन व्हिडिओ करणे सुरुच ठेवले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 9 वाजता महेश्वर त्याच्या सासरी फफौत येथे गेला होता. तिथे त्याच्या पत्नीने आणि सासरच्या मंडळीने त्याची गळा दाबून हत्या केली. ही घटना रविवारी रात्री 10.30 वाजण्याच्या उघड झाली. त्या दिवशी महेश्वरचा भाऊ रुदलने त्याला फोन केला तेव्हा दुसराच कोणीतरी फोन उचलला होता. त्यावर संशय आल्यावर रुदलने त्यांच्या वडिलांना फफौत गावी पाठवले तिथे महेश्वर मृतावस्थेत पडला होता. त्यानंतर त्याची माहिती खोदावंदपुर पोलीस ठाण्यात देण्यात आली.
मृतकच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याची पत्नी व्हिडिओ आणि रील्स व्हिडिओ बनवायची त्याचा महेश्वरने विरोध केला. त्यानंतर तिने आणि त्याच्या घरच्यांनी महेश्वरची गळा दाबून हत्या केली. मृतक महेश्वर कुमार कोलकाता येथे राहून काम करत होता. तर दोन तीन दिवसांसाठी पुन्हा कामाला जात असे. महेश्वर कोलकाताला जाण्यापूर्वी त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी सासरी गेला होता तिथे त्याची हत्या करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी आरोपी पत्नीला ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी खोदाबंदपुर ठाण्याचे अधिकारी मिथिलेश कुमार यांनी टिकटॉकवर व्हिडिओ बनवायची पण पतीला तिचे व्हिडिओ बनवणे आठवत नव्हते. मृतकाच्या कुटुंबीयांनी त्याची पत्नी आणि सासरच्या लोकांवर हत्येचा आरोप लावला आहे. लिखित स्वरुपात तक्रार दिल्यानंतर त्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
Woman Allegedly Kills Husband | Insta Reels
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements