West Bengal Asansol Lok Sabha Seat
बॉलिवूड कलाकार आणि राजकारण हे जुनं समीकरण आहे. अनेक सेलिब्रिटींनी आत्तापर्यंत राजकारणात पाय ठेलत निवडणूक लढवली आहे. दरम्यान तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा बिहारी बाबू, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना पश्चिम बंगालमधील सर्वात हाय प्रोफाईल जागांपैकी एक असलेल्या आसनसोलमधून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. पण भाजपकडून ही निवडणूक कोण लढवणार, शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी कोण स्पर्धा करणार आहे, याबाबत अजून काही स्पष्ट झालेले नाही.
तृणमूल काँग्रेसकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी 2024 च्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी देण्याचा निर्णय टीएमसीने घेतला आहे. हिंदी भाषिक मतदार आणि आसनसोलमधील तृणमूलच्या गटबाजीमुळे आसनसोलमधून शत्रुघ्न सिन्हा यांना रिंगणात उतरवण्यामागचा विचार असल्याचे बोलले जात आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम वर्धमानच्या नेत्यांसोबत बंद दरवाज्या आड झालेल्या या बैठकीत या निर्णयाची पुष्टी झाली. आसनसोलमधून पुन्हा विजयाच्या आशेने शत्रुघ्न सिन्हा यांना तृणमूलकडून तिकीट देण्याची योजना आहे.
माहितीनुसार, शत्रुघ्न सिन्हा यांना प्रादेशिक नेते म्हणून ओळखले जावे, अशी येथील प्रत्येकाची अपेक्षा आहे. 2022 च्या पोटनिवडणुकीत शत्रुघ्न सिन्हा यांनी आसनसोलची जागा 3 लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकली होती. तर यापूर्वी 2014 आणि 2019 मध्ये भाजपने विजय मिळवला होता. त्याचवेळी भाजपकडून अग्निमित्र पॉल आणि जितेंद्र तिवारी यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचे वृत्त समोर आले आहे. अग्निमित्रा पॉल यांना 2022 च्या पोटनिवडणुकीत शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोधात उभे राहिले होते, परंतु त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. तसेच आसनसोलचे माजी महापौर जितेंद्र तिवारी हेही आसनसोल मतदारसंघातून भाजपचे लोकसभेचे उमेदवार असू शकतात. आसनसोलमध्ये बंगाली आणि बिगर बंगाली भाषिक मतदारांची संख्या जवळपास समान आहे. जितेंद्र तिवारी यांची हिंदी भाषिक मतदारांवर चांगली पकड आहे आणि आधी तृणमूलमध्ये असल्यामुळे, ते तृणमूलची रणनीती चांगल्या प्रकारे समजू शकतात, असे भाजपला वाटत आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे.
मिथुन चक्रवर्ती देखील देऊ शकतात मोठी टक्कर : मात्र, शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोधात एखाद्या बड्या स्टारला उभं केलं तर ही तुल्यबळ लढत होईल आणि भाजपला बाजी मारता येईल, अशीही चर्चा भाजपमध्ये सुरू आहे. अशा परिस्थितीत भाजपकडे माजी सुपरस्टार मिथुन चक्रवर्ती यांच्या रूपाने एक मोठा पर्याय आहे. गेल्या वर्षी बंगाल विधानसभा निवडणुकीत मिथुन चक्रवर्ती यांनी जोरदार प्रचार केला होता आणि त्यांना मोठी मागणी होती. मात्र, शत्रुघ्न सिन्हा यांच्याविरोधात कोण निवडणूक लढवेल, याचा निर्णय अद्याप भाजपने घेतलेला नाही. त्याचवेळी ममता बॅनर्जींच्या धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी या आठवड्यात कोलकाता येथे आलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपवर आपल्या खास शैलीत निशाणा साधला होता. पंतप्रधान मुख्य मुद्द्यांवर प्रकाश टाकत नाहीत आणि इतर सर्व गोष्टींवर बोलतात, असे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले. “लोक म्हणतात मी पलटू आहे, पण मी कधीच पलटी खाल्लेली नाही. मी तर नेहमीच सरळ होतो.” असेही ते म्हणाले.
West Bengal Asansol Lok Sabha Seat Mithun Chakraborty Shatrughan Sinha
West Bengal Asansol Lok Sabha Seat
West Bengal Asansol Lok Sabha Seat
West Bengal Asansol Lok Sabha Seat
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310