हिजबुलच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला अटक
दिल्लीत हिजबुल मुजाहिद्दीनच्या एका मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्यावर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी घटनांमध्ये तो वॉन्टेड होता (Delhi Police Special Cell apprehended Javed Ahmed Mattoo – terrorist associated with Hizbul Mujahideen – involved in multiple terrorist incidents in Jammu & Kashmir)
काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी घटना घडवून तो भूमिगत झाला होता. गुरुवारी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या दहशतवाद्याला अटक केली. जावेद अहमद मट्टो असे अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. एनआयएचे पथकही त्याच्या शोधात होते, दिल्ली पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.
हिजबुलचा कमांडर जावेद अहमद मट्टो हा पाकिस्तानात देखील गेला होता. तो सोपोरचा रहिवासी आहे. अलीकडेच सोपोरमध्ये त्याच्या भावाने घरावर तिरंगा ध्वज फडकावला होता जो खूप व्हायरल झाला होता.
दिल्लीचे विशेष पोलिस आयुक्त एच जी एस धालीवाल म्हणाले, दिल्ली पोलिसांच्या विशेष सेल आणि केंद्रीय एजन्सींच्या समन्वयाने जावेद मट्टू, जो A++ श्रेणीचा दहशतवादी आहे. याला अटक केली आहे. त्याच्यावर 10 लाख रुपयांचे बक्षिस होते. त्याच्या ताब्यातून एक पिस्तूल, मॅगझिन आणि चोरीचे वाहन जप्त करण्यात आले. पोलीस कोठडी घेतल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या 5 ग्रेनेड हल्ल्यांमध्ये त्याचा हात होता. वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 पोलीस कर्मचार्यांच्या हत्येत सामील आहे, या घटनांमध्ये १२ पोलीस कर्मचारी जखमी झाले होते, असे धालीवाल म्हणाले.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements