- तब्बल 9 वर्षांनंतर 19 जणांवर दोषारोप निश्चित
बेळगाव—belgavkar—belgaum : येळ्ळूर खटल्याची सुनावणी सोमवारी होती. या खटल्यामध्ये चार्जफ्रेम झाले असून आता या खटल्याच्या सुनावणीला नियमित प्रारंभ होणार आहे. खटला क्रमांक 126 च्या सुनावणीमध्ये एकूण 24 जण असून ते सारे सोमवारी हजर होते. त्यामुळे न्यायालयाने चार्जफ्रेम केले असून गैरहजर राहिलेल्या कार्यकर्त्यांचा खटला मात्र स्वतंत्रपणे सुरू करण्यात येणार आहे. येळ्ळूर येथील वेशीतील ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ हा फलक हटविल्यानंतर येळ्ळूरच्या जनतेला अमानुष मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर येळ्ळूरच्या जनतेवरच विविध खटले दाखल करण्यात आले. यामधील खटला क्रमांक 126 ची सुनावणी सुरू झाली आहे.
येळ्ळूर (ता. बेळगाव) वेशीतील महाराष्ट्र राज्य येळ्ळूर हा फलक हटविल्यानंतर ग्रामस्थांना अमानुष मारहाण करुन सात खटले दाखल करण्यात आले. त्यापैकी एका खटल्याचा निकाल लागला असून सोमवारी एका खटल्यात तब्बल 9 वर्षांनंतर 19 जणांवर दोषारोप निश्चित झाले आहेत. येळ्ळूरच्या वेशीत असलेला महाराष्ट्र राज्य फलक 2014 मध्ये हटविण्यात आला. हा फलक हटविताना शांततेत विरोध करणाऱ्या ग्रामस्थांवर पोलिसांनी अमानुष हल्ला केला. घराघरांत घुसून आबालवृद्धांना मारहाण करण्यात आली. जनावरांनाही सोडण्यात आले नाही. मारहीणीनंतर पोलिसांनी लोकांवरच गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी एका प्रकरणात सोमवारी सुनावणी झाली. या प्रकरणातील 24 पैकी 5 जणांना वगळून इतरांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
अर्जुन नागाप्पा गोरल, चांगदेव सातेरी देसाई, अनंत भरमाजी चिट्टी, वृशेषन चंद्रकांत पाटील, संभाजी बाबुराव हट्टीकर, शिवाजी शंकर कदम, सुनील नागाप्पा धामणेकर, श्रीकांत शिवाजी नांदुरकर, राहुल मारुती कुगजी, नागेश सुभाष बोबाटे, सुनील रामा कुंडेकर, रवळू महादेव कुगजी, केशव कृष्णा हलगेकर, गणपती इराप्पा पाटील, नामदेव विठ्ठल नायकोजी, केशव महादेव पाटील, रमेश जयराम धामणेकर, रामचंद्र नारायण कुगजी आणि सतीश मनोहर कुगजी अशी एकूण 24 संशयितांची नावे आहेत.
न्यायालयाच्या तारखांना वारंवार गैरहजर राहिल्यामुळे परशराम कुंडेकर, गणेश नारायण पाटील, जयवंत पाटील, सातेरी बेळवटकर व रामचंद्र बागेवाडी यांना वगळून खटला स्वतंत्रपणे सुरु करण्यात आला आहे. येळ्ळूरच्या खटल्यांची सुनावणी तब्बल 9 वर्षे सुरु आहे. सदर प्रकरणी दाखल केलेल्या सातपैकी एक खटला निकालात निघाला आहे. ग्रामस्थांतर्फे अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. हेमराज बेंचण्णावर व अॅड. श्याम पाटील काम पाहत आहेत.
Belgaum Yellur Chargesheet Board Issue Yellur Court
Belgaum Yellur Chargesheet Board Issue Yellur Court
Belgaum Yellur Chargesheet Board Issue Yellur Court
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements