सायलेंट हार्ट ॲटकने विद्यार्थ्याचा क्लासमध्ये मृत्यू
वर्गात बसल्या बसल्या कोसळला, 18 वर्षाच्या मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू; थरारक VIDEO
Viral Video : आजकाल कमी वयातच लोकांना हार्ट ॲटक येण्याच्या घटनांमध्ये बरीच वाढ झाली आहे. देशभरात अशा दुर्दैवी मृत्यूच्या अनेक बातम्या समोर येतात. अनेक हादरवणाऱ्या घटना समोर येत असतानाच मध्य प्रदेशच्या इंदौरमध्येही अशीच एक हृदयद्रावक घटना घडली. कोचिंग क्लासमध्ये बसलेल्या एका विद्यार्थ्याचा सायलेंट हार्ट ॲटकने मृत्यू झाला. क्लासमध्ये इतर विद्यार्थ्यांसोबत बसलेला तो तरूण अभ्यास करत असतानाच बघता-बघता बेंचवर धाडकन कोसळला. त्याला नेमकं काय झालं हे त्याच्या आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना कळलंच नाही.
पण तो खाली कोसळला तो उठलाच नाही आणि ते पाहून क्लासमध्ये कल्लोळ माजला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले पण तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्या तरूणाच्या घरात तर स्मशानशांतता पसरली आहे. तरूण मुलाच्या जाण्याचे कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे.
18 y/o boy got heart attack while sitting in coaching class in Indore😢
This is scary
pic.twitter.com/jbwLpJWBQF
— If (@pioneerbhatt) January 18, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण भंवरकुआन येथील आहे. राजा लोधी असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो सागरचा रहिवासी होता. राजा लोधी हा मध्यप्रदेश लोकसेवा आयोगाची तयारी करत होता. यासाठी त्याने इंदूरमध्ये खाजगी कोचिंग सेंटरही लावले होते. नेहमीप्रमाणे बुधवारी दुपारी राजा कोचिंग क्लासमध्ये शिकण्यासाठी आला आणि वर्गमित्रांसोबत जाऊन बसला. काही वेळ तो नीट बसला होता, पण अचानक त्याला काही होऊ लागलं आणि त्याच डोकं झुकंल. पाहता-पाहता तो बेशुद्ध पडला आणि बेंचवर कोसळला.
त्याच्या शेजारच्या मुलाला वाटलं की तो झोपलाय, पण मध्येच त्याचं डोक वर झालं आणि त्याच्या चेहऱ्यावर वेदना दिसू लागल्या, तो परत कोसळला. त्याची तब्येत बिघडल्याचं आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना समजलं आणि त्यांनी क्लासमधील सरांना या गोष्टीची कल्पना दिली. त्यामुळे मित्रांनी तत्काळ त्याला जवळच्या रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तेथे त्याला मृत घोषित केले. हृदय विकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनमुळे परिसरात एकच खळबळ माजली. डॉक्टरांनी राजाला तातडीने दाखल करून उपचार सुरू केले. त्यांना तातडीने आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. मात्र बुधवारी सायंकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. आता पोस्टमार्टम रिपोर्टमधून मृत्यूचे खरं कारण समोर येईल.
Viral Video Student Died in Coaching Class. @Viral Video Student Died in Coaching Class. Viral Video Student Died in Coaching Class
Viral Video Student Died in Coaching Class
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements