“अमानवी कृत्य…!” कुत्र्याच्या पिल्लाला पाजली व्हिस्की;
धक्कादायक घटनेचा Video Viral
अलीकडेच, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे (Viral Video : Puppy Made to Drink Whiskey), ज्यामध्ये काही पुरुष कुत्र्याच्या पिल्लाला व्हिस्की पाजताना दिसत आहेत (Viral Video). या व्हिडिओवर आता सोशल मीडिया वापरकर्ते आणि प्राणी प्रेमींकडून तीव्र टीका आणि निषेध करण्यात आला आहे. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये मोकळ्या जागेत शेकोटीभोवती बसलेल्या पुरुषांचा एक गट देखील दिसत आहे आणि एका काचेच्या ग्लासामध्ये पिल्लाला मद्य देताना दिसत आहे.
कुत्र्याचे पिल्लू मद्य पित आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मोबाइलमध्ये शुटिंग करताना दिसत आहे. ट्विटमध्ये या व्यक्तीच्या फेसबूकअकांउटची माहिती दिली आहे ज्यामध्ये राजस्थानच्या सवाई माधोपूर भागात राहत असून त्याचे नाव “शेरू बोरदा” असल्याचे दिसत आहे. दरम्यान राजस्थान पोलिसांनी या ट्विटरवर लवकर कारवाई केली आणि स्थानिक पोलिसांना तातडीने लक्ष घालण्याचे निर्देश दिले. पोस्टवर प्रतिक्रिया देताना स्थानिक पोलिसांनी कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.
कुत्र्यांना मद्य कधीही का देऊ नये?
“कोणत्याही कुत्र्याच्या प्रजातींना कधीही मद्य देऊ नये कारण त्यांच्या चयापचय प्रक्रियेत मद्य सुरक्षितपणे पचवले जाऊ शकत नाही” हे लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे आहे. कुत्र्यांमध्ये मद्य प्रभावीपणे पचवण्यासाठी आवश्यक एंजाइम नसतात त्यामुळे पेये, खाद्यपदार्थ किंवा घरगुती उत्पादने असे विविध प्रकार ज्यामध्ये मद्याच अंश आहे हे त्यांच्यासाठी संभाव्यत: हानिकारक आणि विषारी असतात. कुत्र्यांनी मद्याचे सेवन केल्याने त्यांच्यामध्ये आळशीपणा (lethargy), श्वसनसंबधीत नैराश्य (respiratory depression)आणि शरीराचे तापमान धोकादायकपणे कमी होणे यासह प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. तुमच्या पाळीव कुत्र्याच्या भल्यासाठी, त्यांना बिअर, वाईन किंवा मद्य यासारख्या कोणत्याही अल्कोहोलयुक्त पेयांपासून दूर ठेवण्यासाठी दक्ष राहणे अत्यावश्यक आहे. शिवाय, कच्च्या पीठासारख्या खाद्यपदार्थांसह सावधगिरी बाळगा, कारण त्यात मद्याचा अंश असू शकतो.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements