भारत तुमची आई नाहीय का?
केंद्रीय मंत्री मिनाक्षी लेख यांनी ‘भारत माता की जय’ बोलण्यास नकार देणाऱ्या केरळच्या नागरिकांवर संताप व्यक्त केला आहे. त्या कोझिकोड येथील एका युवा संमेलनात संबोधित करत होत्या. या संमेलनात त्यांनी ‘भारत माता की जय’ची घोषणा देण्यास सांगितलं होतं. परंतु, गर्दीतील काही लोकांनी घोषणाबाजी करण्यास नकार दिला. यामुळे मिनाक्षी लेखी यांनी संताप व्यक्त केला (India not your mother? Meenakshi Lekhi irked at audience over Bharat Mata ki Jai).
‘भारत माता की जय’ बोलण्यास नकार देणाऱ्या जनतेला मिनाक्षी लेखी यांनी विचारलं की भारत तुमची आई नाहीय का? तसंच, त्यांनी घोषणाबाजी करण्यास नकार दिलेल्या एका महिलेला कार्यक्रमस्थळातून निघून जाण्याचीही सूचना केली. या संमेलनाचं आयोजन दक्षिणपंथी संघटनेनं केलं होतं.
Proud of Meenakshi Lekhi, who threw that Mallu lady out, who was not ready to chant Bharat Mata ki Jai.
यदि भारत में रहना होगा, भारत माता कि जय कहना होगा
— AParajit Bharat 🇮🇳 (@AparBharat) February 4, 2024
मिनाक्षी लेखी कोझिकोडमधील एका युवा संमेलनात संबोधित करत होत्या. संमेलनाच्या उत्तरार्धात त्यांनी भाषण आटोपताना ‘भारत माता की जय’ ची घोषणा केली. परंतु, त्यांना उपस्थितांमधून प्रतिसाद कमी मिळाला. त्यामुळे त्यांनी थेट विचारलं की, “भारत तुमचं घर नाहीय का. भारत फक्त माझी आई का आहे? की तुमचीही आहे? काही अडचण आहे का?” सुरुवातीला प्रतिसाद कमी मिळाल्यावर मिनाक्षी लेखी यांनी पुन्हा ‘भारत माता की जय’ची घोषणा दिली. मात्र तेव्हाही कमी प्रतिसाद मिळाला. तसंच, त्यांच्या डाव्या बाजूला बसलेल्या लोकांकडून कमी प्रतिसाद मिळत होता. त्यावेळी एका महिलेला उद्देशून त्या म्हणाल्या, पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली महिलेने उभं राहावं. इथं-तिथं पाहू नका. मी तुमच्याशी बोलतेय. मी तुम्हाला थेट विचारते, भारत तुमची आई नाहीय का? हा अँटीट्युड का?
असा प्रश्न विचारल्यावरही त्या संबंधित महिलेने ‘भारत माता की जय’ची घोषणा देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या मिनाक्षी लेखी यांनी त्यांना तिथून निघून जाण्यास सांगितलं. त्या म्हणाल्या, “मला वाटतं तुम्ही इथून निघून गेलं पाहिजे. ज्यांना देशाचा गर्व नाही, ज्यांना भारताबाबत बोलण्यास लाज वाटते, त्यांना युवा संमेलनात सहभाग घेण्याची गरज नाही.”
Viral Video audience over Bharat Mata ki Jai
Viral Video audience over Bharat Mata ki Jai
Viral Video audience over Bharat Mata ki Jai
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements