लहानपणी अनेक सिनेमा आणि कार्टून्समध्ये आपण एखाद्या रोबोटला घरात स्वयंपाक बनवण्यापासून ते धुणी-भांडी करताना पाहिले आहे. तेव्हा अनेकांना ‘आपल्यादेखील घरात असे झटपट आणि सगळी कामे करणारा एखादा रोबोट असला तर किती मजा येईल…’ असे वाटलेही असेल. मात्र, आता सध्याच्या झपाट्याने प्रगत होत चाललेल्या तंत्रज्ञानाकडे बघता, तो दिवससुद्धा दूर नाही, असे वाटते. कारण आहे एलॉन मस्कने शेअर केलेला ऑप्टिमस रोबोटचा व्हिडीओ (Elon Musk shares video of humanoid robot Optimus folding a shirt).
एक्स [पूर्वीचे ट्विटर] या सोशल मीडियावर टेस्ला ऑप्टिमस या एका मानवाप्रमाणे दिसणाऱ्या रोबोटचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये काळ्या-पांढऱ्या रंगाचा रोबो; त्याने टेबलावर ठेवलेल्या एका वेताच्या टोपलीमधून काळ्या रंगाचा टीशर्ट घेतला आणि धीम्या गतीने घडी घालून ठेवून दिला. शेअर केलेल्या व्हिडीओला टेस्लाच्या सीईओ एलॉन मस्कने, ‘शर्टच्या घड्या घालणारा ऑप्टिमस’ [‘ऑप्टिमस फोल्ड्स शर्ट’] अशी कॅप्शन दिली आहे. “हा ऑप्टिमस अजून स्वतंत्रपणे काम करू शकत नसला तरीही भविष्यात ते नक्कीच शक्य होईल. तेव्हा केवळ एका टेबलावर ठेवलेल्या टीशर्टची घडी घालण्यापलीकडे अजून बरेच काही हा रोबो करू शकेल,” अशी माहिती देणारी अजून एक पोस्ट एक्सवर शेअर केली गेली आहे.
Optimus folds a shirt pic.twitter.com/3F5o3jVLq1
— Elon Musk (@elonmusk) January 15, 2024
“ऑप्टिमस जेन-२ रोबोमध्ये टेस्लाने डिझाईन केलेले अॅक्ट्युएटर्स आणि सेन्सर बसवण्यात आले असून, त्यामध्ये जलद गतीने आणि अधिक काम करू शकणारे हात, चालण्याची जलद गती, हलके वजन, उंच मान इत्यादी गोष्टी बसवण्यात आल्या आहेत,” अशी कॅप्शन टेस्लाने यूट्युबवर ऑप्टिमसचा व्हिडीओ शेअर करताना लिहिली होती.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी होणाऱ्या प्रगतीचे भरपूर कौतुक केले आहे; तर काहींनी भविष्यात हेच रोबोट्स मानवासाठी कसे घातक ठरू शकतील याबद्दल विनोद केले आहेत. काहींनी हॉलीवूडमध्ये दाखवल्या जाणाऱ्या रोबोट्सचे उदाहरण दिले आहे. नेटकरी यावर नेमके काय म्हणत आहेत पाहा.
“सुरुवातीला कपड्यांच्या घड्या करणारा… आणि नंतर…” : असे एकाने लिहून एका ‘टर्मिनेटर’ नावाच्या हॉलीवूड सिनेमाचे GIF पोस्ट केले आहे. “अतिशय सुंदर. सर्व टीमचे अभिनंदन,” असे म्हणत दुसऱ्याने कौतुक केले आहे. तिसऱ्याने, “वाह! अतिशय नाजूकतेने काम करीत आहे,” असे म्हटले आहे. चौथ्याने, “सुरुवात झाली आहे,” असे लिहून खाली हातात शस्त्र घेतलेले दोन रोबोट्स उभे असल्याचा फोटो शेअर केला आहे. अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात.
Video Optimus Humanoid Robot Folding Shirt
Video Optimus Humanoid Robot Folding Shirt
Video Optimus Humanoid Robot Folding Shirt
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements