इंडिगो फ्लाइटमध्ये मोठा गोंधळ Video Viral
Viral Video : गेल्या काही दिवसांमध्ये विमान प्रवासादरम्यान गोंधळ घातल्याच्या आणि क्रूवर चिडल्याच्या, त्याच्यांशी वाद घातल्याच्या घटना वारंवार समोर येतात. अशातच, एका विमान प्रवासादरम्यान एका व्यक्तीने क्रूवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. विमानात प्रवाशांनी गोंधळ घातला आणि क्रूच्या अंगावर अचानक धावून जात हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
विमान उड्डाणाला उशीर झाल्यामुळे संतप्त झालेल्या एका व्यक्तीने वैमानिकावर हल्ला केला आहे. आता या घटनेचा आरोप असलेल्या प्रवाशाला अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओ पॅसेंजर सीटवरून शूट करण्यात आला आहे. पायलट आणि इतर क्रू मेंबर्स उभे राहून काही घोषणा करत असल्याचे दिसत आहे. अचानक एक व्यक्ती वेगाने धावत येतो आणि पायलटवर हल्ला करतो. या घटनेनंतर फ्लाइटमध्ये उपस्थित प्रवासी आणि एअर होस्टेस आवाज करू लागले. तेव्हा ज्या पायलटवर हल्ला झाला तो आत जातो (Video Delhi-Goa IndiGo passenger attacks captain).
काय आहे प्रकरण? : मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना इंडिगो विमानात घडली. मात्र ते कोणत्या विमानाचे होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. असे म्हटले जात आहे की, विमानाच्या सुरुवातीच्या क्रूने FDTL म्हणजेच फ्लाइट ड्युटी वेळेच्या मर्यादांचे उल्लंघन केले, ज्यामुळे नवीन पायलट विमानात आले आणि घोषणा करत होते. विशेष म्हणजे विमानाला खूप उशीर झाला होता. यावेळी संतापलेला एका प्रवासी ज्याने पिवळ्या रंगाची हुडी घातलेला तो तरुण आला आणि त्याने घोषणा करत असलेल्या पायलटवर हल्ला केला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे की, त्याला मारहाण करणाऱ्या व्यक्ती आणि एअर होस्टेसमध्ये वाद झाला होता. एकीकडे ती व्यक्ती म्हणत आहे, ‘विमान चालवायचं असेल तर चालवा, नसेल तर चालवू नका, गेट उघडा… किती वेळ आम्ही इथे बसलो आहोत?’.
A passenger punched an Indigo capt in the aircraft as he was making delay announcement. The guy ran up from the last row and punched the new Capt who replaced the previous crew who crossed FDTL. Unbelievable ! @DGCAIndia @MoCA_GoI pic.twitter.com/SkdlpWbaDd
— Capt_Ck (@Capt_Ck) January 14, 2024
दरम्यान, धुक्यामुळं विमान प्रवासाला उशीर होत असल्यामुळं अनाउसमेंट करणाऱ्या पायलटला मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात एव्हिएशन सिक्युरिटी एजन्सीने तपास सुरू केला आहे. इंडिगोने मारहाण करणाऱ्या प्रवासी व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे. दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटला (6E-2175) धुक्यामुळे उशीर होत होता त्यावेळी पायलट विमान उशीर होत असल्याची माहिती देत होता. त्यावेळी त्याला मारहाम करण्यात आली होती. साहिल कटारिया असं या प्रवाशाचं नाव असल्याची माहिती आहे.
IndiGo passenger attacks pilot after 13-hour delay in departure, arrested. Viral video
Video : Passenger punches Delhi-Goa IndiGo captain after 13-hour delay due to fog
Video Delhi-Goa IndiGo passenger attacks captain
Video Delhi-Goa IndiGo passenger attacks captain
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements