पोलिस येताच…; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “ट्रेन असो वा बैलगाडी…”
Vande Bharat Train Viral Video : देशभरात लोकप्रिय होत असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसशी संबंधित अनेक व्हिडीओ रोज समोर येत असतात. तुम्ही आत्तापर्यंत बस, लोकल ट्रेन आणि एक्स्प्रेसमधील प्रवाशांच्या हाणामारीचे व्हिडीओ पाहिले असतील, पण यात आता भारतातील सुपरफास्ट ‘वंदे भारत’एक्स्प्रेसचे नावही जोडले गेले आहे; कारण या ट्रेनमध्येसुद्धा प्रवाशांमध्ये अनेक कारणांवरून हाणीमारीचे प्रसंग घडताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर वंदे भारत ट्रेनमधील प्रवाशांच्या वादाचा असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात दोन प्रवासी चक्क सामान ठेवण्यावरून भांडताना दिसतायत. पण, हे भांडण काही वेळाने इतके वाढते की चक्क पोलिसांना मदतीला धावून यावे लागते (Vande Bharat train Viral Video : Passengers fight over luggage space).
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन प्रवासी आपापसात सीटवरील सामान ठेवण्याच्या जागेसाठी एकमेकांशी भांडत आहेत. यातील एका प्रवाशाचे सामान इतकं जास्त होतं की, त्यामुळे दुसऱ्या प्रवाशाला सामान ठेवण्यासाठी जागा उरली नाही. त्यामुळे आपली हक्काची जागा मिळवण्यासाठी दुसरा प्रवासी शाब्दिक वाद घालू लागला. यात त्याने शिवीगाळही केली. यावेळी एकाने तर दुसऱ्याच्या सीटवरच सामान ठेवलं. काही वेळात वाद इतका वाढला की, उपस्थित इतर प्रवाशांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून एक पोलिस कर्मचारी तिथे पोहोचले. यावेळी पोलिसाने वाद घालणाऱ्या प्रवाशांना शांत करत त्यांना सामानासाठी व्यवस्थित जागा करून दिली, ज्यानंतर हे भांडण थांबले.
Kalesh b/w Two Uncle inside Vande bharat train over Bag Spot pic.twitter.com/YD4uJSxQfh
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) January 16, 2024
दरम्यान, @gharkekalesh या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, वंदे भारत ट्रेनमध्ये बॅग ठेवण्याच्या जागेवरून दोन काकांमध्ये संघर्ष. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ज्यावर नेटिझन्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, आमचे लोक खूप सामान घेऊन प्रवास करतात, हे हास्यास्पद आहे. प्रत्येकाला ते त्यांच्या सीटच्या वरील जागेत सर्व सामान ठेवायचे असते. परंतु, जागा फक्त दोन प्रवाशांचे सामान राहील इतकीच असते, त्यामुळे ट्रेनच्या डिझाइनमध्ये बदल केला जाणार नाही. पण, लोक त्यांच्या सवयी बदलणार नाहीत.
आणखी एका युजरने लिहिले – वंदे भारत असो की बैलगाडी, आम्ही भारतीय सर्वत्र भांडू शकतो. या व्हिडीओवर कमेंट करताना आणखी एका युजरने लिहिले, आम्ही लोक छोट्या छोट्या गोष्टींवर भांडतो. वंदे भारत असो वा कुठलेही विमान असो, आपण भारतीय सर्वत्र भांडण्यासाठी नेहमी कारण शोधतो (Viral Video : वंदे भारत गाडीतील प्रवाश्यांनी अन्न चक्क फेकून दिले).
Vande Bharat train Viral Video over luggage space. Vande Bharat train Viral Video over luggage space
Vande Bharat train Viral Video over luggage space
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements