मुलगा उदयनिधी बनणार उपमुख्यमंत्री?
तमिळनाडूमध्ये (Tamil Nadu) सध्या जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. सत्ताधारी डीएमके पक्षाचे नेते व क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदीचा माळ पडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रमुख विरोधी पक्षानेही त्याला दुजोरा दिला असून उदयनिधी हे 2026 च्या निवडणुकीत डीएमकेचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, असे भाकितही वतर्वले आहे.
डीएमकेचे (DMK) सर्वेसर्वा व मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (MK Stalin) हे फेब्रुवारी महिन्यात परदेश दौऱ्यावर जाणार आहे. त्याआधीच उदयनिधी यांना उपमुख्यमंत्री करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते. स्टॅलिन परदेशात गेल्यानंतर उदयनिधीच वडिलांच्या जागी राज्याचा कारभार सांभाळतील, अशी शक्यता आहे. डीएमकेच्या युवक आघाडीची 21 जानेवारीला बैठक बोलावण्यात आल्याने याबाबत जोरात चर्चा सुरू आहे.
डीएमकेचे सचिव टीकेएस एलनगोवन यांनी अंतिम निर्णय स्टॅलिन यांचा असेल, असे सांगत ही शक्यता फेटाळून लावली नाही. मात्र, त्यांनी त्यावर थेट भाष्यही केले नाही. उदयनिधी हे पक्षात सक्रीय असल्याने त्यांना उपमुख्यमंत्री केल्यास काहीच चुकीचे नाही. त्याबाबतचा निर्णय केवळ मुख्यमंत्रीच घेतील, असे एलगोवन म्हणाले.
उदयनिधी यांनी मात्र ही अफवा असल्याचे म्हटले आहे. केवळ मुख्यमंत्रीच कोणताही निर्णय घेतील, असे ते म्हणाले आहेत. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या एआयडीएमकेने ही अफवा नसून सत्य असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही हे मागील वर्षभरापासून म्हणत आहोत, जेव्हा त्यांना निवडणुकीत तिकीट देण्यात आले, असे एमआयडीएमकेच्या (AIDMK) नेत्यांनी म्हटले.
उदयनिधी यांना आधी तिकीट देण्यात आले. नंतर मंत्री करण्यात आले. आता ते उपमुख्यमंत्री होतील. तर 2026 च्या निवडणुकीत तेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील. घराणेशाहीचे डीएमके हा पक्ष उत्तम उदाहरण आहे. वडील, मुलगा, नातू आणि आता पणतू हेच फक्त पक्ष चालवण्यासाठी सक्षम आहेत. यावरूनच डीएमकेमध्ये लोकशाही नसल्याचे दिसते, अशी टीका प्रवक्ते कोवई सत्यन यांनी केली.
Udhayanidhi Stalin to become Tamil Nadu Deputy Chief Minister?
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements