गुजरातमध्ये रस्त्याच्या कडेला आपला ट्रक उभा करुन नमाज पढणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी रविवारी सांगितलं की, गुजरातच्या बनासकांठा येथे एका ड्रायव्हरने रस्त्यावर गर्दी असताना कोणतीही परवानगी न घेता नमाज पढली आहे. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. (Truck driver arrested for offering ‘namaz’ on roadside in Gujarat)
रस्त्यावर गर्दी असताना, वाहने येतजात असताना व्यक्तीने आपली ट्रक बाजुला लावली. त्यानंतर तो आपल्या ट्रक समोर नमाज पढू लागला. या प्रकाराचा एकाने व्हिडिओ काढला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर टीका होऊ लागली होती. हा व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचला. त्यानंतर याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३७ वर्षीय बचल खान याला अटक करण्यात आली आहे. बचल खान याच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम २८३, १८६ आणि १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला शनिवारी अटक करण्यात आली आहे. पालनपूर एरोमा सर्कलवर बचल खान याने रस्त्याच्या कडेला नमाज पठण केले. मीडिया रिपोर्टनुसार, यामुळे काहीवेळ ट्रॅफिक जाम झाली होती. यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे (Truck driver arrested namaz on roadside). व्हिडिओमध्ये दिसतंय की एक व्यक्ती ट्रकच्या समोर नवाज पढत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावरुन लोकांनी अशा कृतीला विरोध करत बचन खान याच्यावर टीका केली आहे. नमाज पठण रस्त्यावर केल्यामुळे ट्रॅफिक जाम झाली होती. हे चुकीचं आहे, असं एकाने म्हटलं.
Truck driver arrested namaz on roadside
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements