Tamil actor Thalapathy Vijay
Tamil actor Thalapathy Vijay announces political party, names it ‘Tamilaga Vettri Kazhagam’ : दक्षिणेतील सुपरस्टार थलपती विजयने अखेर शुक्रवारी राजकारणात एंट्री केली आहे. आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ पाडणाऱ्या Tamil actor Thalapathy Vijay च्या राजकारणातील प्रवेशाने तमिळनाडूतील राजकीय गणितं बिघडणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नवीन राजकीय पक्षाची घोषणा करत विजयने इतर पक्षांचं टेन्शन वाढवलं आहे. (Tamil actor Thalapathy Vijay)
मागील काही दिवसांपासून थलपती विजय राजकारणात (Politics) प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. अखेर शुक्रवारी त्याने सोशल मीडियातून याबाबत अधिकृत घोषणा केली. मागील आठवड्यात चेन्नईमध्ये विजयच्या फॅन क्लबची बैठक झाली होती. या बैठकीत राजकीय पक्ष स्थापन करण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला होता.
अभिनेताच विजयने सोशल मीडियात दिलेल्या माहितीनुसार, तमिलगा वेत्री कळघम (Tamilaga Vettri Kazhagam) या आमच्या पक्षाची नोंदणी करण्याचा अर्ज निवडणूक आयोगाला आज दिला जाणार आहे. तमिळनाडूच्या (Tamil Nadu) 2026 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका हे आमचे लक्ष्य आहे. लोकांना राजकारणात हवे असलेले मुलभूत बदल घडवून आणण्यासाठी काम करणार असल्याचे विजय स्पष्ट केले आहे.
माझ्यासाठी राजकारण हे दुसरे करिअर नाही. हे लोकांसाठी पवित्र काम आहे. खूप दिवसांपासून मी यासाठी तयारी करत आहे. माझ्यासाठी राजकारण हा छंद नाही. ही माझी मनापासूनची इच्छा आहे. मला राजकारणात झोकून द्यायचे आहे. सध्या प्रशासकीय अनियमितता, भ्रष्टाचारी राजकीय संस्कृती, जात-धर्माच्या नावाखाली लोकांना तोडण्याचे प्रयत्न होत आहेत, असेही विजयने म्हटले आहे.
Tamil actor Thalapathy Vijay
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तोंडावर विजयने राजकीय पक्षाची घोषणा केल्याने या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार उतरणार का किंवा कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार, याबाबत उत्सुकता होती. पण विजयने स्पष्ट केले आहे की, आपला पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार नाही किंवा कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार आहे. राज्यातील विधानसभा निवडणुका आपले लक्ष्य असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. विजयचा दक्षिणेत मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे राजकारणात त्याला किती प्रतिसाद मिळतोय, हे लवकरच समजेल.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements