बेळगाव—belgavkar—belgaum : महाराष्ट्र केसरी किताब मिळविणाऱ्या सिकदंर शेखने पंजाबचा भारत केसरी हितेश काला याला अवघ्या कांही मिनिटातच एकचाकी डावावर चारीमुंडी चितपट करून उपस्थित कुस्ती शौकीनांची वाहवा मिळविली. बैलहोंगल येथील प्रसिध्द मरडी बसवेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त गुरुवारी कला आणि क्रीडा वेदिकेच्या वतीने मरडी बसवेश्वर कुस्ती मैदानात भव्य निकाली कुस्त्या आयोजित करण्यात आल्या होत्या.
महाराष्ट्र केसरी मल्ल सिकदंर शेख याने पंजाबचा भारत केसरी हितेश काला यांच्यातील प्रथम क्रमांकाची कुस्ती प्रमुख पाहुणे बैलहौंगलचे आमदार महांतेश कौजलगी, वेदमूर्ती महातंय्या यांच्या हस्ते लावण्यात आली. प्रारंभी दोन्ही मल्लांनी परस्परांच्या ताकदीचा अंदाज घेतला. सिकदंर शेखने संधीचा फायदा घेत हुशारीने एकचाकी डावावर पंजाबचा भारत केसरी मल्ल हितेश काला याला चारीमुंडी चितपट केले.
दुसऱ्या क्रमाकांची कुस्ती महाराष्ट्रचा चॅम्पियन मल्ल जय जाधव विरुध्द बेळगावचा पैलवान संजू इंगळगी यांच्यातील लढत सुमारे एक तास कुस्ती रंगली होती. परंतु उशीर झाल्याने सदर कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.
तिसरी लढत बेळगांव कंग्राळीचा पैलवान पार्थ पाटील याने नॅशनल पैलवान रामू पवार याला अस्मान दाखविले. चौथ्या क्रमांकाच्या लढतीत बैलहौंगलचा पैलवान अर्हान याने ओंकार गुडकीवर विजय मिळविला. धुवने धनंजयलाला पराजित केले. सिध्दूने धारवाडच्या बसवराजवर विजय मिळविला. चिक्कबागेवाडीचा शंकर व इंडीचा अशोक यांच्यातील कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. विविध भागातून सुमारे 50 मल्लांनी आपला सहभाग दर्शविला. या आखाड्यात पंच म्हणून सिद्राय बसापा होटी, बसाप्पा कुडसोमन्नावर, मडीवाळप्प होटी, बसापा बैलवाड यांनी काम पाहिले. दुंडाप्पा अक्की यानी समालोचन केले.
Sikander Sheikh Kusti Bailhongal Belgaum
Sikander Sheikh Kusti Bailhongal Belgaum
Sikander Sheikh Kusti Bailhongal Belgaum
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements