मुंबई : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबाराची घटना ताजी असताना मुंबईत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अभिषेक हे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पूत्र आहेत. दरम्यान, हल्लेखोरानेही स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक घोसाळकर, हे शिवसेना नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे ते चिरंजीव असून उपचारासाठी त्यांना करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेनंतर शिवसेनेच्या यूबीटी गटाच्या शिवसनिकांनी निषेधार्थ मॉरीसच्या कार्यालयाची पूर्णपणे तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेनंतर दहिसर परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यामुळे या ठिकाणी आता अतिरिक्त पोलिस बळ मागवत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
हल्लेखोर मोरीस याचाही मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अभिषेक यांची हत्या ही पूर्वनियोजित असल्याचा तपास अधिकाऱ्यांचा संशय असून दहिसर पोलीस तसेच क्राइम ब्रांच या प्रकरणी तपास करत आहे. फेसबुक लाइव्हदरम्यान माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर मॉरिस नोरोन्हा ऊर्फ मॉरिस भाईच्या कार्यालयातच 5 गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याने मुंबई हादरली. घोसाळकरांच्या हत्येपाठोपाठ मॉरिसनेही स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांसह गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.
मॉरिस आणि अभिषेक यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून मतभेद होते. ते नुकतेच मिटल्याचा दावा केला जात होता. मॉरिस याने गुरुवारी कार्यालयाबाहेर साडी वितरण कार्यक्रम ठेवला. घोसाळकर तेथे पोहोचताच त्यांनी गळाभेट घेतली. दोघे एकत्र आल्याने कार्यकर्त्यांमध्येही जल्लोष होता. साडेसातच्या सुमारास आपण एकत्र आल्याचे नागरिकांना समजावे म्हणून मॉरिसने फेसबुक लाइव्हसाठी अभिषेक यांना कार्यालयात नेले. दोघांनी एकमेकांमधील गैरसमज दूर करून एकत्र आल्याचे सांगितले.
फेसबुक लाइव्हदरम्यान अभिषेकवर गोळीबार झाला. या चार मिनिटांच्या फेसबुक लाइव्हमध्ये मॉरिस सुरुवातीला गॉड ब्लेस यू म्हणत घोसाळकरांना बोलण्यास सांगतो. घोसाळकर यांनी बोलताना, आज मॉरिस भाईंसोबत लाइव्ह येण्याची संधी मिळाली. अनेक जण सरप्राइज होतील म्हणतात.
मॉरिस मध्येच येत, आज बहोत सारे लोग सरप्राइज होगे असे म्हणतो. तसेच काही गोष्टी एकतेसाठी, चांगले काम करण्यासाठी होतात, असेही बोलून पुन्हा घोसाळकरांना दोन शब्द बोलण्याचा आग्रह करतो.
घोसाळकर यांनी बोलताना, एक चांगली दिशा घेऊन आम्ही पुढे जात आहोत. साडी, रेशन वाटण्याच्या कार्यक्रमाबरोबरच मुंबई ते नाशिक बस प्रवास सुरू करणार आहोत. नवीन संकल्प घेत एकत्र काम करणार आहोत. आमच्यात, कार्यकर्त्यांमध्ये काही गैरसमज होते. मात्र आता एकत्र येत काम करणार असे ते अभिषेक म्हणाले. बोलणे झाल्यानंतर उठून जात असतानाच त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या गेल्या.
Shivena Abhishek Ghosalkar shot dead
Shivena Abhishek Ghosalkar shot dead
Shivena Abhishek Ghosalkar shot dead
Shivena Abhishek Ghosalkar shot dead
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements