‘पद्मावत’नंतर पुन्हा एकदा ऐतिहासिक सिनेमात
2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ऐतिहासिक चित्रपट पद्मावतमध्ये राजा रावल रतन सिंहची भूमिका साकारल्यानंतर शाहिद कपूर आणखी एका ऐतिहासिक सिनेमांत दिसणार आहे. विशेष म्हणजे यावेळी तो महाराष्ट्राचे आराध्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे शाहिदची ही भूमिका महत्वाची असेल. ओह माय गॉड 2 चे दिग्दर्शक अमित राय या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. येत्या काळात हा सिनेमादेखील एक बिग बजेट सिनेमा असेल (Shahid Kapoor to star in an epic historical film on Chhatrapati Shivaji Maharaj?).
पिंकविलाने अलीकडे दिलेल्या रिपोर्टनुसार, शाहिद कपूर ओ माय गॉड 2 चे दिग्दर्शक अमित राय यांच्यासोबत या प्रोजेक्टवर चर्चा करत आहे. अश्विन वर्दे यांच्या ‘वाकाओ फिल्म्स’ या बॅनरची निर्मिती असलेला हा ऐतिहासिक चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाबाबत निर्माते आणि अभिनेत्यात ही चर्चा सुरू होती, आता ती जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे (Shahid Kapoor Cast as Chhatrapati Shivaji Maharaj Historic Role).
अमित राय बद्दल बोलायचे तर त्यांनी 2023 मध्ये रिलीज झालेल्या ओह माय गॉड 2 या हिट चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यापूर्वी त्यांनी रोड टू संगम या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तर टिंग्या या मराठी चित्रपटाचे त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक केले होते. शिवाय 2023 चा पंजाबी चित्रपट डियर जस्सी याचे लेखन केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित हा चित्रपट अमित राय यांच्या दिग्दर्शनाचा तिसरा चित्रपट असेल.
शाहिद कपूर लवकरच तेरी बातों में ऐसा उल्झा जिया या चित्रपटात क्रिती सेननसोबत दिसणार आहे. हा एक सायन्स फिक्शन कॉमेडी रोमँटिक चित्रपट असणार आहे, हा सिनेमा येत्या 9 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय शाहिद कपूर देवा या चित्रपटात दिसणार आहे. शाहिदचा दुसरा चित्रपट देवा ची घोषणा ऑक्टोबर 2023 मध्ये करण्यात आली होती. हा चित्रपट यावर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजेच 11 ऑक्टोबरला प्रदर्शित होऊ शकतो. या चित्रपटातील शाहिदचा फर्स्ट लूकही समोर आला आहे.
Shahid Kapoor Cast as Chhatrapati Shivaji Maharaj Historic Role
Shahid Kapoor Cast as Chhatrapati Shivaji Maharaj Historic Role
Shahid Kapoor Cast as Chhatrapati Shivaji Maharaj Historic Role
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements