महाराष्ट्र : सांगली-शिराळा : प्रेमप्रकरणातून मुलीला पळवून नेल्याने बेळगाव तालुक्यात मुलाच्या आईला खांबाला बांधून मारहाण केल्याची घटना ताजी असतानाचं बेळगाव जिल्ह्याच्या शेजारील महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यात तशीचं एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मांगले (ता. शिराळा) येथे प्रेमप्रकरणातून मुलाच्या वडिलांना मुलीच्या नातेवाईकांनी विद्युत खांबाला बांधून लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली. यात मुलाच्या वडिलांचा मृत्यू झाला. दादासो रामचंद्र चौगुले (वय ५५, रा. मांगले) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी 12 जणांवर शिराळा पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. बेळगावातील घटनेत मात्र पोलिसांमुळे महिलेचा जीव वाचला होता.
तर संशयित सुरेश महादेव पाटील, संजय महादेव पाटील, रविंद्र मधुकर पाटील, संदीप पाडळकर (सर्व रा. मांगले) यांना अटक केली आहे. याबाबत मुलाच्या आईने राजश्री दादासाहेब चौगुले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मृत दादासाहेब चौगुले यांचा मुलगा गणेश याने संशयित आरोपी सुरेश महादेव पाटील यांच्या मुलीला बुधवारी पहाटे प्रेमसंबंधातून पळवून नेले. दादासो चौगुले व त्यांची पत्नी राजश्री पहाटे मोटरसायकलवरून जनावरांचे दूध काढण्यासाठी मांगले येथील धनटेक वसाहत येथील शेडवर गेले. दादासाहेब चौगुले यांचे शेड व पाटील यांचे राहते घर जवळच आहे. दादासाहेब दूध काढण्यासाठी आल्याचे समजताच सुरेश पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी दादासाहेब व त्यांच्या पत्नीला आमची मुलगी तुमचा मुलगा घेऊन गेला आहे. ते कोठे गेला आहे, ते सांगा. यावर दादासाहेब म्हणाले की, आम्ही आत्ताच आलो आहे, आम्हाला काही माहिती नाही.
त्यावर सुरेश पाटील व अन्य पाच जणांनी दादासाहेब यांना विद्युत खांबाला बांधून घालून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीनंतर दादासाहेब बेशुद्ध अवस्थेत पडले. त्यांनतर पाटील कुटुंबीयांनी त्यांना येथील खासगी रुग्णालयात नेले. तेथे त्यांना पुढील उपचारासाठी शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यास सांगितले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत अटक करण्यात आलेल्या चार संशयितांसह कविता संजय पाटील, पद्दमा सुरेश पाटील, शुभांगी प्रविण पाटील, प्रविण राजाराम पाटील, सनीराज संजय पाटील, संग्रामसिंग भालचंद्र पाटील, सचिन बाबूराव पाटील, अजय अरविंद पाटील, (सर्व रा. मांगले) यांनी दादासाहेबांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत दादासो यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात व उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात सकाळपासून गर्दी केली होती. संशयितांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. रात्री उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम करीत आहेत.
sangli shirala murder father love murder
sangli shirala murder father love murder
sangli shirala murder father love murder
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements