कुरुंदवाड : कुरुंदवाड-नांदणी दरम्यानच्या रस्त्यावर सांगली येथील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष विष्णु कदम (वय 36, रा. गावभाग सांगली, कुरुंदवाड हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील गाव) याचा धारदार चाकूने वार करुन खून झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. मारुती स्वीफ्ट या चारचाकी वाहनातच खून करुन हल्लेखोर वाहन रस्त्यावर सोडून पसार झाले. आज सकाळी ही घटना रस्त्यावर ये जा करणार्या शेतकर्यांच्या सजगतेमुळे उघड झाली.
पोलिसांनी घटनास्थळावरून दोन धारदार चाकू स्पोर्ट शूज व एक फुटलेला मोबाइल जप्त केला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कुरुंदवाड-नांदणी रस्त्यावर गट क्रमांक 1012/1 यांच्या शेतलगत अनोळखी मोटार उभी असलेली कांही शेतकर्यांना दिसली. एका शेतकऱ्याने वाहनात डोकावून पाहिले असता गाडीत ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या सीटवर एका युवक रक्तबंबाळ अवस्थेत दिसला. त्या शेतकर्याने तात्काळ पोलिस ठाण्याशी संपर्क साधून सदरची माहिती दिली.
त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस पोलीस फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे,सांगली शहरचे पोलीस निरीक्षक विजय मोरे, गुन्हे अन्वेषण विभाग, फॉरेन्सिक तपासणी केंद्राचे आणि स्वामी पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तपासाची चक्रे गतिमान केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सखोल चौकशीत खून झालेल्या युवकाचे नाव Right To Information (RTI) संतोष कदम असल्याचे स्पष्ट झाले.
अज्ञात हल्लेखोरांनी संतोष याला वाहनातून आणून त्याच्यावर धारदार चाकूने वार केले व त्यांनी पलायन केले. पोलिसांनी खूनासाठी वापरलेला दोन धारदारचाकू गाडीतून जप्त केले. शिवाय मृत संतोष याचा मोबाइल फुटक्या अवस्थेत सापडला. झटापटीत मोबाइल फुटला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाहनाची दरवाजे खुली करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
sangli rti activist murder kurundwad kolhapur
sangli rti activist murder kurundwad kolhapur
sangli rti activist murder kurundwad kolhapur
sangli rti activist murder kurundwad kolhapur
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements