राम मंदिराच्या निर्माणावर प्रश्न
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि सरकारमधील मंत्री उदयनिधी यांच्या राम मंदिराबाबतच्या वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांनी राम मंदिराच्या निर्माणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मशीद तोडून त्याठिकाणी मंदिर बांधणे हे डीएमकेला मान्य नाही, असं ते म्हणाले आहेत (Ram Mandir in Ayodhya : Udhayanidhi Stalin Says DMK Doesn’t Accept Construction Of Temple By Razing Mosque)
उदयनिधी यांनी यापूर्वी केलेल्या काही वक्तव्यांमुळेही वाद निर्माण झाला आहे. त्यांनी सनातन धर्माची तुलना कोरोना विषाणू आणि डेंगुशी केली होती. त्यानंतर त्यांच्या ताज्या वक्तव्याने वाद निर्माण होऊ शकतो. स्टॅलिन यांचा पक्ष डीएमके हा इंडिया आघाडीसोबत आहे. त्यामुळे भाजप या मुद्द्यावरुन आक्रमक होण्याची शक्यता आहे राम मंदिर दर्शनासाठी सर्वांसाठी कधीपासून खुले होईल?.
उदयनिधी हे चेन्नईमध्ये पत्रकारांशी बोलत होते. डीएमके कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. पण, मशीद पाडून त्या ठिकाणी मंदिर निर्माण करणे आम्हाला मान्य नाही, असं म्हणत त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केलीये. तमिळनाडूमध्ये विरोधी पक्ष AIADMK ने देखील राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक मीडियाच्या रिपोर्टनुसार, उदयनिधी यांना तमिळनाडूमध्ये उपमुख्यमंत्री बनवले जाण्याची शक्यता आहे. अधिकृतरीत्या याबाबत काहीही सांगण्यात आलं नाही. पण, चर्चा जोरदार सुरु झाल्या आहेत. उदयनिधी यांनी मात्र याला अफवा म्हणत फेटाळलं आहे.
उदयनिधी यांनी सनातन धर्मावर टीका केली होती. काही गोष्टींचा विरोध केला जात नाही. त्यांना संपवलं जातं. आपण डेंगु, मलेरिया कोरोना यांचा विरोध करत नाही. त्यांना नष्ट करावं लागतं. तसंच सनातन धर्माला देखील आपल्याला नष्ट करावं लागेल, असं ते एका कार्यक्रमात म्हणाले होते. यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता.
Ram mandir in Ayodhya Udhayanidhi Stalin
Ram mandir in Ayodhya Udhayanidhi Stalin
Ram mandir in Ayodhya Udhayanidhi Stalin
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310