राजस्थानचे नवीन मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यासमवेत होणारी मोठी दुर्घटना सुदैवाने टळली. तुरुंगात बंद असलेल्या एका आरोपीने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर, दुसऱ्याच दिवशी ते जेव्हा स्वत:च्या खोलीत गेले, तेव्हा रुममध्ये आग लागल्याचं दिसून आलं. त्यामुळे, घराची बेल वाजवून त्यांनी सुरक्षा रक्षकांना तात्काळ बोलावून घेतलं. त्यानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
देशातील 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश मिळालं. त्यात, राजस्थानमध्येही स्पष्ट बहुमत जिंकत भाजपाने सत्ता स्थापन केली. मात्र, येथील मुख्यमंत्रीपदी अचानक पहिल्यांदाच आमदार बनलेल्या भजनलाल शर्मा यांची वर्णी लागली. त्यामुळे, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भजनलाल शर्मा यांनी पदभार स्वीकारुन कामकाजालाही सुरुवात केली आहे. नुकतेच, त्यांच्यासोबत अपघात होता होता वाचला.
मंगळवारी रात्री भजनलाल शर्मा दिल्लीत होते. दिल्लीतील जोधपूर हाऊसमध्ये ते मुक्कामी होते. त्यांच्या येथील रुममधील इलेक्ट्रीक हीटरच्या प्लगमध्ये शॉर्ट सर्कीट होऊन आग लागली. रात्री 2 वाजता प्लगमधून धूर बाहेर येऊ लागला. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांनी बेल वाजवून सुरक्षा अधिकाऱ्यांस बोलावून घेतलं. या सुरक्षा रक्षकांनी ती आग विझवली. याप्रकरणी, एका ज्युनियर इंजिनिअरला निलंबित करण्यात आले असून सखोल चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.
दरम्यान, भजनलाल शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलीस कंट्रोल रुममध्ये मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला होता. पोलिसांनी घटनेचा तपास केला असता फोन करणाऱ्याचे लोकेशन शोधले. त्यावेळी, फोन तुरुंगातून आल्याचे समजले. याप्रकरणी, तुरुंग प्रशासनातील 2 वार्डनचे निलंबन करण्यात आले आहे. जयपूर मध्यवर्ती कारागृहातून हा फोन आला होता. या आरोपीवर मनोरुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Rajasthan CM Bhajanlal Sharma receives death threat from jail inmate
Rajasthan CM Bhajanlal Sharma death threat
Rajasthan CM Bhajanlal Sharma death threat
Rajasthan CM Bhajanlal Sharma death threat
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements