जम्मू-काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात. हिवाळा ऋतुत राज्यात सर्वत्र बर्फाची पांढरी चादर पसरलेली दिसते. हे मनमोहन दृष्ट पाहण्यासाठी दरवर्षी हजारोच्या संख्येने पर्यटक जम्मू-कश्मीरमध्ये जातात. यंदाही राज्यात बहुतांश ठिकाणी बर्फवृष्टी सुरू आहे, ज्यामुळे परिसर अतिशय सुंदर दिसतयो. अशातच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याची सोशल मीडियावर मोठी चर्चा होत आहे.
Railway Minister Shared Jammu Kashmir snowfall Video
राज्यातील गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहलगाममध्येही बर्फवृष्टी झाली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पांढऱ्याशुभ्र बर्फातून रेल्वे धावताना दिसत आहे. अशाप्रकारचे दृश्य अनेकदा स्वित्झर्लंडसारख्या देशात पाहायला मिळते, पण रेल्वेमंत्र्यांमुळे जम्मूमधील हे दृष्य भारतीयांना पाहायला मिळाले आहे.
कश्मीर की वादियों में स्नोफॉल !
📍Baramulla – Banihal section pic.twitter.com/WCsMSYKRqd
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) February 1, 2024
रेल्वेमंत्र्यांनी शेअर केलेला व्हिडिओ नेटकऱ्यांना खूप आवडला असून, यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने लिहिले की, हे भारतातील दृष्य वाटत नाही. दुसऱ्याने लिहिले, मालदीवनंतर स्वित्झर्लंडलाही जाण्याची गरज नाही. तिसऱ्याने लिहिले की, हे सर्व पीएम मोदींमुळे घडले आहे. दरम्यान, काही नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर टीका केली असून, इतर राज्यातील गाड्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
Railway Minister Shared Jammu Kashmir snowfall Video
Railway Minister Shared Jammu Kashmir snowfall Video
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements