व्हिडिओ शेअर करत भाजपचा आरोप
Rahul Gandhi seen offering dog biscuits to party worker in Viral Video : ‘भारत जोडो न्याय यात्रे’ दरम्यान श्वानाच्या पिल्लाला बिस्किटे खाऊ घालताना दिसत असलेल्या एका व्हायरल व्हिडिओवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लक्ष्य केले आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडिओमध्ये राहुल गांधी एका श्वानाच्या पिल्लाला बिस्कीट खायला घालताना दिसत आहेत आणि नंतर पिल्लाने ते बिस्किट नाकारल्यानंतर राहुल गांधीनी ते बिस्कीट पक्षाच्या एका समर्थकाला देताना दिसत आहेत.
दरम्यान, अधिकृत भारत जोडो न्याय यात्रा हँडलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बिस्किट क्लिपचा समावेश नव्हता. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सध्या झारखंडमध्ये सुरू असलेल्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान एका श्वानाच्या पिल्लाला बिस्किटे खाऊ घालताना दिसत असलेल्या एका व्हायरल व्हिडिओवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. यादरम्यान, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी ‘भारत जोडो न्याय यात्रे’ दरम्यानचा हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये राहुल गांधी एका काँग्रेस कार्यकर्त्याला श्वानाला बिस्किटे देताना दिसत आहेत.
अभी कुछ दिन पहले कांग्रेस अध्यक्ष खड़गे जी ने पार्टी के बूथ एजेंटों की तुलना कुत्तों से की और यहाँ राहुल गांधी अपनी यात्रा में एक कुत्ते को बिस्किट खिला रहे हैं और जब कुत्ते ने नहीं खाया तो वही बिस्किट उन्होंने अपने कार्यकर्ता को दे दिया।
जिस पार्टी का अध्यक्ष और युवराज अपने… pic.twitter.com/70Mn2TEHrx
— Amit Malviya (@amitmalviya) February 5, 2024
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हिडिओ शेअर करताना अमित मालवीय यांनी म्हटलं आहे की, काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी पक्षाच्या बूथ एजंटची तुलना श्वानांशी केली होती आणि इथे राहुल गांधी यांनी त्यांच्या दौऱ्यावेळी एका श्वानाला बिस्किटे खाऊ घालत आहेत आणि श्वानाने ती खाल्ली नाही तेव्हा त्यांनी तीच बिस्किट त्यांच्या कार्यकर्त्याला दिली. यासोबतच त्यांनी लिहिले आहे की, ‘एखाद्या पक्षाचा अध्यक्ष आणि युवराज आपल्या कार्यकर्त्यांना श्वानासारखे वागवत असतील, तर असा पक्ष नाहीसा होणे स्वाभाविक आहे. त्यांनी या पोस्टमध्ये सवाल उपस्थित केला आहे, आता ‘शहजादा’ पक्षाच्या कार्यकर्त्याला श्वानाने नाकारलेले बिस्किट देत आहे. हाच त्यांच्या कार्यकर्त्यांचा, समर्थकांचा आणि मतदारांचा आदर आहे का?
Rahul Gandhi offered dog biscuits to party worker
Rahul Gandhi offered dog biscuits to party worker
Rahul Gandhi offered dog biscuits to party worker
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements