R Ashwin becomes second fastest to 500 Test wickets
Fastest Indian to 500 wickets
IND vs ENG 3rd Test @राजकोट : भारतीय संघ विकेटच्या शोधात असताना पुन्हा एकदा आर अश्विन आपल्या संघासाठी धावून आला. वेगवान गोलंदाजांची धुलाई होताच कर्णधार रोहित शर्माने फिरकीपटूंच्या हाती चेंडू सोपवला. बेन डकेटने स्फोटक खेळी करून यजमानांची डोकेदुखी वाढवली. त्याला झॅक क्रॉली सावध खेळी करून साथ देत होता. पण, अश्विनने आपल्या तगड्या अनुभवाचा फायदा घेत क्रॉलीला बाद करून इंग्लंडला पहिला झटका दिला. या बळीसह अश्विनने 500 बळी घेण्याची किमया साधली. अनिल कुंबेळेनंतर सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे.
सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज
मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) – 800 बळी
शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) – 708 बळी
जेम्स अँडरसन (इंग्लंड) – 696 बळी
अनिल कुंबळे (भारत) – 619 बळी
स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) – 608 बळी
ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) – 563 बळी
कोर्टनी वॉल्श (वेस्ट इंडिज) – 519 बळी
नॅथन लायन (ऑस्ट्रेलिया) – 517 बळी
आर अश्विन (भारत) – 500 बळी
तिसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 130.5 षटकांत सर्वबाद 445 धावा केल्या. रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी शतकी खेळी करून मोठी धावसंख्या उभारण्यात मोलाची भूमिका बजावली. याशिवाय पदार्पणवीर सर्फराज खानने 62 धावांची स्फोटक अर्धशतकी खेळी केली. इंग्लंडकडून पहिल्या डावात मार्क वुडने सर्वाधिक 4 बळी घेतले, तर रेहान अहमद 2 आणि जेम्स अँडसरन, टॉम हार्टली, आणि जो रूट यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले.
R Ashwin Fastest Indian to 500 wickets
R Ashwin Fastest Indian to 500 wickets
R Ashwin Fastest Indian to 500 wickets
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements