या 2 महिला कार्यकर्त्यांनी सांगितलं ‘हे’ कारण
Watch : Climate activists throw soup at glass-protected Mona Lisa painting : विख्यात चित्रकार लिओनार्डो द विंची यांनी काढलेलं अजरामर चित्र म्हणजे ‘मोनालिसा’चं चित्र (Mona Lisa, the 16th-century painting by Leonardo da Vinci). पॅरीसच्या लूवर या म्युझियममध्ये हे चित्र आहे Mona Lisa at the Louvre Museum in Paris. या चित्रावर सूप फेकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चित्रावर बुलेटप्रूफ काच होती, त्यामुळे या चित्राला काहीही झालेलं नाही. मात्र दोन महिला कार्यकर्त्यांनी या काचेवर सूप फेकलं, संग्रहालयातील सुरक्षेला चकवा देत त्या या ठिकाणी आल्या होत्या. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे (Protesters throw soup at Mona Lisa in Paris).
ज्या दोन महिलांनी हे कृत्य केलं त्या पर्यावरणवादी कार्यकर्त्या आहेत असंही समजतं आहे. उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घडल्या प्रकारानंतर चित्रासमोर काळ्या रंगाचा स्क्रिन लावला होता. 2 महिला कार्यकर्त्या आल्या आणि त्यांनी सरकार तसंच प्रशासनाला प्रश्न विचारला आहे की अधिक महत्त्वाचं काय आहे कला की निरोगी आणि योग्य अन्नप्रणाली? कृषी व्यवस्था खराब आहे, शेतकरी काम करताना मरत आहेत. त्यामुळे पर्यावरण तसंच अन्न स्रोतांची गरज अधोरेखित व्हावी यासाठी आम्ही हे आंदोलन केलं असं या पर्यावरणवादी महिला कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
ALERTE – Des militantes pour le climat jettent de la soupe sur le tableau de La Joconde au musée du Louvre. @CLPRESSFR pic.twitter.com/Aa7gavRRc4
— CLPRESS / Agence de presse (@CLPRESSFR) January 28, 2024
लूवर संग्रहालयात दोन महिला येतात. त्या मोनालिसाच्या चित्राजवळ जातात. तसंच त्या मोनालिसाचं चित्र ज्या काचेच्या पलिकडे आहे त्यावर सूप फेकतात हे दिसतं आहे. मात्र मोनालिसाच्या चित्रावर बुलेटप्रूफ काच लावण्यात आली असल्याने या चित्राचे कुठलेही नुकसान झालेले नाही. मात्र या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मोनिलासाचं चित्र हे लूवर म्युझियममध्ये ठेवण्यात आलं आहे. याआधी एका 2022 च्या आंदोलनादरम्यान मोनालिसाच्या चित्रासमोरची काच दाबण्यात आली होती. तसंच ऑक्टोबर 2022 मध्ये लंडन येथील नॅशनल व्हिन्सेंट व्हॅन गॉगच्या सूर्यफुलाच्या चित्रावर सूप फेकण्यात आले होते. इंधनाच्या वाढत्या किंमती, धोरणांमध्ये झालेले बदल यांचा निषेध करत नुकतीच काही शेतकऱ्यांनी फ्रान्समध्ये निदर्शनं केली होती. त्यानंतर आता मोनालिसाच्या चित्रावर सूप फेकण्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संग्रहालयाने पोलिसात तक्रार केली आहे.
Protesters throw soup at Mona Lisa in Paris
painting by Leonardo da Vinci
Protesters throw soup at Mona Lisa in Paris
Protesters throw soup at Mona Lisa in Paris
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements