किमान आधारभूत किमतीसाठी (MSP) कायदा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी पंजाब आणि हरियाणातील हजारो शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच केली आहे. हजारो शेतकरी त्यांचे ट्रॅक्टर, ट्रक घेऊन दिल्लीच्या वेशीवर धडकले आहेत. देशभरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी चंडीगडमध्ये केंद्र सरकारने चर्चा केली. परंतु, चर्चेच्या पहिल्या फेरीत कुठल्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र केलं आहे. तसेच या शेतकऱ्यांनी १६ फेब्रुवारी रोजी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे (Haryana Police lob teargas shells at Shambhu border to prevent farmers’ Dilli Chalo march).
दरम्यान, शेतकरी हरियाणा आणि पंजाबमधील शंभू सीमेवर दाखल झाले आहेत. परंतु, पोलिसांनी शेतकऱ्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला. तर शेतकऱ्यांनी मागे हटण्यास नकार दिला. त्यामुळे आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्याचबरोबर पोलिसांनी शेकडो शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. दुसऱ्या बाजूला सिंघू सीमेवरही पोलिसांनी नाकेबंदी केली आहे.
#WATCH | Police fire tear gas to disperse protesting farmers at Punjab-Haryana Shambhu border. pic.twitter.com/LNpKPqdTR4
— ANI (@ANI) February 13, 2024
शेतकरी सकाळी १० वाजता पंजाबच्या फतेहगड साहिब येथे दाखल झाले होते. तिथून शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने कूच केली. शेतकरी आता शंभू सीमेवर दाखल झाले आहेत. हरियाणा आणि पंजाबमधील शंभू सीमेवरील शेतकरी दिल्लीकडे जाण्यासाठी ठाम आहेत. दरम्यान, पोलिसांनी शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या असून, त्यानंतर चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना २०० मीटरपर्यंत मागे ढकलण्यात आले.
Police lob teargas shells at Shambhu border
Police lob teargas shells at Shambhu border
Police lob teargas shells at Shambhu border
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements