पोलिस हा समाजातील सर्वात महत्त्वाचा घटक
Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक महिला पोलिसाने एका महिलेचे प्राण वाचवले आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भारावून जाल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पोलिस हा समाजातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे.
प्रत्येक नागरीक सुरक्षित राहावा, यासाठी पोलिस 24 तास काम करत असतात. गावात किंवा शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. पोलिसांमुळेच आपण सुरक्षित आहोत. हा व्हिडीओ पाहून तु्म्हालाही या पोलिस महिलेचे कौतुक करावेसे वाटेल. हा व्हायरल व्हिडीओ एका रस्त्यावरील आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक महिला रस्त्यावर खाली झोपलेली दिसत आहे आणि तिच्या भोवती लोकांची गर्दी दिसत आहे. या गर्दीमध्ये तुमची नजर एक महिला पोलिस कर्मचाऱ्याकडे जाईल.
व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे, ही महिला पोलिस कर्मचारी या महिलेला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत आहे. या महिलेला हार्ट अटॅक आला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. ही पोलिस कर्मचारी रक्त प्रवाह राखण्यासाठी सीपीआर देण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. त्यानंतर ती महिलेचे हात पाय हलवण्याचा प्रयत्न सुद्धा करते. पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की तिच्या मदतीने त्या महिलेचा प्राण वाचते आणि महिला पोलिस कर्मचारी तिला उचलून घेऊन जाते. सध्या या व्हिडीओची सगळीकडे चर्चा सुरू आहे (Police Cop Woman CPR Video Viral).
rubab_khakicha या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “महिला पोलिसाच्या चांगल्या कामामुळे एका महिलेचे प्राण वाचले. भारतीय पोलीस तुमच्या कार्याला सलाम” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान काम केले मॅम” तर एका युजरने लिहिलेय, “सलाम ताई तुमच्या कार्याला” अनेक युजर्सनी पोलिस महिला कर्मचाऱ्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
Police Cop Woman CPR Video Viral
Police Cop Woman CPR Video Viral
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements