वनवास काळात श्रीरामाचे होते वास्तव्य
Kalaram Temple in Nashik
अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. प्राणप्रतिष्ठेच्या दिवशीही भक्त आपापल्या पद्धतीने श्रीरामांप्रती आपली भक्ती व्यक्त करतील. अयोध्येतील राम मंदिराच्या भव्य ‘प्राण-प्रतिष्ठा’ सोहळ्याच्या अवघ्या 10 दिवस आधी पीएम मोदी एका खास ठिकाणी गेले आहेत, हे ठिकाण म्हणजे नाशिकमधील (महाराष्ट्र) श्री काळाराम मंदिर. पीएम मोदींच्या या भेटीला अधिक महत्त्व आहे, कारण प्रभू रामाच्या जीवनात या भेटीला खूप महत्त्व आहे. पीएम मोदी आज श्री काळाराम मंदिरात पोहोचले. यामुळे या मंदिराची जोरदार चर्चा सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी 11 दिवसांचे अनुष्ठान सुरू केले आहे, श्री काळा राम मंदिर महाराष्ट्रातील नाशिकच्या पंचवटी परिसरात आहे. याच मंदिरात पीएम मोदी गेले आहेत. रामायणाशी निगडित ठिकाणांपैकी पंचवटी हे सर्वात विशेष आणि महत्त्वाचे स्थान मानले जाते कारण येथे रामायणातील अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत. प्रभू राम, माता सीता आणि लक्ष्मणजी यांनी पंचवटी प्रदेशात असलेल्या दंडकारण्य जंगलात काही वर्षे घालवली. पंचवटी नावाचा अर्थ 5 वटवृक्षांची जमीन (Kalaram Temple in Nashik).
असे मानले जाते की भगवान रामाने येथे आपली झोपडी बांधली, कारण 5 वटवृक्षांनी हा परिसर शुभ झाला. अयोध्येतील राम मंदिराच्या भव्य ‘प्राण-प्रतिष्ठा’ सोहळ्याच्या अवघ्या 11 दिवस आधी, पंतप्रधान मोदींची या ठिकाणी भेट अधिक महत्त्वाची मानली जाते, कारण प्रभू रामाच्या जीवनात या ठिकाणाला खूप महत्त्व आहे. श्री काळाराम मंदिर हे नाशिक शहरातील पंचवटी परिसरात असलेले एक जुने हिंदू मंदिर आहे. प्रभू राम, माता सीता आणि लक्ष्मण यांनी आपला वनवास पंचवटीत घालवला.
Kalaram Temple हे नाशिकचे सर्वात खास मंदिर मानले जाते. काळाराम मंदिर हे भगवान रामाला समर्पित आहे, जे गर्भगृहात काळ्या पाषाणाच्या मूर्तीच्या रूपात विराजमान आहे. या मंदिरात भगवान श्री राम सोबत माता सीता आणि लक्ष्मणजींच्या मूर्ती देखील स्थापित आहेत. या मंदिराबद्दल असे म्हटले जाते की, सरदार रंगारू ओढेकर नावाच्या व्यक्तीच्या स्वप्नात प्रभू राम आले होते. गोदावरी नदीत काळ्या रंगाची मूर्ती तरंगताना दिसली. पहाटे नदीच्या काठी पोहोचले आणि खरच श्रीरामाची काळी मुर्ती होती. ती मूर्ती आणून मंदिरात बसवण्यात आली. हे मंदिर 1782 मध्ये बांधले. पूर्वी येथे लाकडापासून बनवलेले मंदिर होते. हे मंदिर बांधण्यासाठी 12 वर्षे लागली. यामुळे नाशिक येथील पंचवटीमधील श्रीकाळाराम मंदिराला महत्व आहे. म्हणून पंतप्रधान मोदी यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या 11 दिवस आधी भेट दिली (PM Modi Kalaram Temple in Nashik).
PM Modi Kalaram Temple in Nashik
PM Modi Kalaram Temple in Nashik
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements