खासदारांसोबत जेवतांना मोदींनी सांगितला ‘तो’ किस्सा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संसदेच्या कँटिनमध्ये खासदारांसोबत लंच केलं. यावेळी भाजप खासदार हीना गावित, एस. फांगनोन कोन्याक, टीडीपी खासदार राममोहन नायडू, बसपा खासदार रितेश पांडे आणि भाजप खासदार सस्मित पात्रा यांच्यासह एनके प्रेमचंद यांची उपस्थिती होती.
माहितीनुसार, खासदारांना औपचारिक लंचबद्दल अडीच वाजता फोनद्वारे माहिती देण्यात आली. यावेळी पंतप्रधान म्हणाले, चला आज तुम्हाला एक सजा देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत खासदारांनी शाकाहारी जेवण केलं. जेवणावेळी सुरु असलेल्या चर्चेत एका खासदाराने त्यांना नवाज शरीफ यांच्या भेटीबद्दल विचारलं. त्यावेळी पंतप्रधानांनी अचानक ठरलेल्या पाकिस्तान दौऱ्याची माहिती दिली. मोदी म्हणाले की, मी त्यादिवशी 2 वाजेपर्यंत संसदेत होतो. त्यानंतर अफगाणिस्तानसाठी रवाना झालो. माघारी येत असताना त्यांनी पाकिस्तानमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मात्र SPG अर्थात Special Protection Group (SPG) ने असं करण्यास नकार दिला.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, एसपीजीने विरोध करुनही मी नवाज शरीफ यांना फोन केला आणि रिसीव्ह करायला येणार का, असं विचारलं. त्यानंतर पाकिस्तानात गेलो. मोदींनी खासदारांसोबत चर्चा करताना, आयुष्यातील अनुभव आणि योगाबद्दल माहिती दिली. खिचडी हा माझा आवडता पदार्थ असल्याचं त्यांनी सांगितलं. ”कधी कधी माझा एवढा प्रवास होतो की मला कळतच नाही की मी एक दिवसही झोपलेलो नाही.” असं म्हणत मोदींनी देशासाठी घेत असलेल्या कष्टाबद्दल सांगितलं.
PM Modi in Pakistan even after SPG refused
PM Modi in Pakistan even after SPG refused
PM Modi in Pakistan even after SPG refused
PM Modi in Pakistan even after SPG refused
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements