रामनाथ कोविंद यांनी जनतेला केलं ‘हे’ आवाहन
देशात एकाच वेळी सर्व प्रकारच्या निवडणुका घेण्याबाबत अर्थात ‘One Nation – One Election’
One Nation – One Election नवी दिल्ली : देशात एकाच वेळी सर्व प्रकारच्या निवडणुका घेण्याबाबत अर्थात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ सध्या पडताळणी केली जात आहे. दोन महिन्यांपूर्वी याबाबत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. पण इतके दिवस हा विषय चर्चेत नसताना अचानक आता याबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. (‘One Nation – One Election’)
‘वन नेशन, वन इलेक्शन’बाबत अपडेट अशी की, यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जनतेकडून याबाबत सूचना मागवल्या आहेत. यासाठी समितीच्या वेबसाईटवर या सूचना पाठवण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.
‘वन नेशन, वन इलेक्शन’ व्यवस्था राबवण्यासाठी विशिष्ट कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यामुळं सध्याच्या प्रशाकीय व्यवस्थेत बदल करुन वन नेशन वन इलेक्शन व्यवस्थेला पूरक असे बदल करण्यासाठी जे योग्य ते बदल करावे लागतील, ते काय असू शकतील याबाबत या सूचना असणार आहेत.
या सूचना कुठे आणि कधीपर्यंत पाठवायच्या याचा तपशीलही या समितीनं जाहीर केला. त्यानुसार, या समितीच्या वेबसाईटवर http://onoe.gov.in किंवा [email protected]. या ई-मेल आयडीवर या सूचना पाठवायच्या आहेत. यासाठी १५ जानेवारी २०२४ ही डेडलाईन देण्यात आली आहे.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310