कुठल्या देशात वापरल्या जातात अशा नोटा
देशात सध्या प्लास्टिकच्या नोटांची चर्चा आहे. भारतात लवकरचं चलनात प्लास्टिकच्या नोटा येण्याची चर्चा सुरु आहे. 2018 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) प्लास्टिकच्या नोटांवर अभ्यास सुरू केला होता. तेव्हापासून याबाबत वेगवेगळ्या चर्चा होत आल्या आहेत. सरकारने सध्या तरी प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याचा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे म्हटले आहे. प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याचा कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत दिली आहे. त्यामुळे भारतात तरी सध्या प्लास्टिकच्या नोटा येणार नसल्याचं स्पष्ट झाले आहे.
सरकारकडून नेहमीच बनावट नोटांना आळा घालण्याच्या प्रयत्न असतो. पण तुम्हाला माहित आहे की अनेक देशांमध्ये प्लास्टिकच्या नोटा वापरल्या जात आहे. बनावट नोटांना आळा घालण्यासाठी देखील हे पाऊल उचलले जावू शकते. प्लास्टिकच्या नोटांचे काही फायदे आहेत तर काही तोटे देखील आहेत. चला पाहुया प्लास्टिकच्या नोटा कोणत्या देशात वापरले जातात? आता आपण जगातील 23 अशा देशांबाबत चर्चा करणार आहोत जेथे प्लास्टिकच्या नोटा वापरल्या जातात. यामध्ये 6 देश असे आहेत ज्यांनी त्यांच्याकडच्या सर्व नोटा या प्लास्टिकच्या केल्या आहेत.
कोणत्या देशात कधी पासून वापरल्या जातात प्लास्टिकच्या नोटा
ऑस्ट्रेलिया 1988 (पहिला देश)
न्यूझीलंड 1999
रोमानिया 2005
पापुआ न्यू गिनी 1975
व्हिएतनाम 2003
ब्रुनेई 2004
कागदी आणि प्लास्टिकच्या नोटा वापरणारे देश
ब्राझील
चीन
हाँगकाँग
इंडोनेशिया
इस्रायल
लेबनॉन
मलेशिया
मेक्सिको
नेपाळ
निकाराग्वा
पोलंड
सिंगापूर
श्रीलंका
थायलंड
युक्रेन
उरुग्वे
प्लास्टिकच्या नोटांचे फायदे काय : प्लास्टिकच्या नोटा या टिकाऊ असतात आणि सहज खराब देखील होत नाहीत. त्या ओल्या झाल्या तरी खराब होत नाहीत. याशिवाय बनावट नोटांना देखील आळा बसतो. कागदी नोटांपेक्षा प्लास्टिकच्या नोटा महाग असतात. त्या रिसायकल करणे देखील कठीण असतात. प्लास्टिकच्या नोटा या पर्यावरणासाठी हानिकारक असू शकतात.
भारतात चर्चा कधी सुरू झाली? : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2018 मध्ये प्लास्टिकच्या नोटा वापरता येऊ शकतात का यावर अभ्यास सुरु केला होता. पण यावर अजून तरी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
No decision to introduce plastic notes RBI Currency
No decision to introduce plastic notes RBI Currency
No decision to introduce plastic notes RBI Currency
No decision to introduce plastic notes RBI Currency
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements